Maharashtra | राज्यातील साखर कारखाने 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र केंद्रिय प्रदुषण मंडळाने महाराष्ट्र प्रदुषण मंडळाला राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पर्यावरण संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन केलेआहे अशा कारणावरून ही कारवाई करण्यात यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखानदारांना हंगाम सुरू होण्यापूर्वीच मोठा झटका बसलेला आहे.
political| भाजपला मोठा धक्का..! बडा नेता कॉंग्रेसच्या वाटेवर…
महाराष्ट्रातील 210 सहकारी साखर कारखान्यांपैकी 105 कारखान्यांमध्ये गळात हंगाम सुरू होणार आहे. दरम्यान राज्यातील 45 कारखान्यांना प्रदुषण मंडळाने नोटीस दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राज्यातील अनेक साखर कारखाने प्रदुषणाचे नियम पाळत नसल्याची बाब कित्येक वेळा समोर आलेली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नद्यांवर थेट परिणाम झालेला आहे.
दरम्यान 45 साखर कारखान्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्यास या कायद्याच्या कलम 5 नुसार कोणताही कारखाना कारखाना बंद करणे, कारखान्याची वीज-पाणी तोडणे तसेच अन्य सुविधा बंद करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कमलेश सिंग यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.
Onion Market| खरीपाच्या रांगड्या कांदयाची आवक सुरू; किंमतीही वाढणार..?
या 45 कारखान्यांना भेट देऊन पाहणी करून सत्यस्थिती जाणून घ्यावी तसेच गंभीर नियम उल्लघंन करणारे कारखाने बंद करण्याची प्रक्रिया निश्चित करावी तसेच वीज तोडण्याचे निर्देश महावितरणला द्यावेत. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचा आदेश रद्द झाल्याशिवाय यातील कोणत्याही कारखान्यांचा हंगाम सुरू होणार नाही, असे पहावे आणि याचा अहवाल 10 नोव्हेंबरपर्यंत द्यावा, असे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठविलेल्या या पत्रात म्हटलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम