GST : वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या 50 व्या बैठकीत आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आता तुम्हाला ऑनलाइन गेमिंग कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे. आजच्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के कर लागणार आहे. हा कर पूर्ण दर्शनी मूल्यावर लावला जातो.
जीएसटी परिषदेच्या 50 व्या बैठकीच्या निर्णयानुसार आता तुम्हाला ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगमधून मिळणाऱ्या कमाईवर कर भरावा लागेल.
पश्चिम बंगालचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की, परिषदेने दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे कॅन्सरचे औषध डिनुटुक्सिमैब (Dinutuximab) आणि फूड फॉर स्पेशल मेडिकल पर्पज (FSMP) च्या आयातीवर जीएसटी सूट देण्यासही मान्यता दिली आहे.
Monsoon Update : पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भ आणि मराठवाड्यातही यलो अलर्ट
GST परिषदेने खाजगी ऑपरेटर्सच्या GST उपग्रह प्रक्षेपण सेवेलाही सूट दिली आहे.
चंद्रिमा भट्टाचार्य यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की
कॅसिनो, हॉर्स रेसिंग आणि ऑनलाइन गेमिंगवर कर लावण्याचा विचार करणाऱ्या मंत्र्यांच्या गटाच्या शिफारशीच्या आधारे कर दर निश्चित करण्यात आला आहे.
कर लावण्याच्या निर्णयानंतर अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला की या करामुळे गेमिंग उद्योग संपणार नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाले की गेमिंगला इतर कोणत्याही उद्योगापेक्षा कमी लेखले जाऊ शकत नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम