नाशिक: जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून यावेळी कांदा उत्पादक वेठीस धरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कांदा व्यापाऱ्यांनी आपली खरेदी काही मांगण्यांसाठी थांबवली आहे. यातील मागण्या काही केंद्र आणि काही मागण्या राज्य पातळीवरील आहेत. यासंदर्भात आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी बैठक घेतली. यावेळी संप मागे घेण्याची विनंती भुसे यांनी केली आहे.
कांदा प्रश्ना संदर्भात व्यापाऱ्यांच्या या मागण्यांबात 26 तारखेला मंत्रालयात बैठक होणार आहे. तोपर्यंत कांदा खरेदी करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना भुसे यांनी केले आहे. मात्र व्यापाऱ्यांनी उद्या बैठक घेवून कांदा खरेदी बाबत निर्णय घेणार असल्याचे व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले आहे.
या बैठकीवेळी नाफेडचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांना सूचना देत आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांची कांदा खरेदी केली त्या शेतकऱ्यांची नावे, गाव व इतर माहिती 1 तासात वेबसाईटवर अपलोड करण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या आहेत. या नंतर शेतकऱ्यांच्या काही तक्रार असल्यास संबंधित यंत्रणा अथवा माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी भुसेंनी केले.
कांदा प्रश्नावर आज दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक, नाफेडचे अधिकारी, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम