Onion Rate | ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ कडून खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून पंचवीस रुपये प्रति किलो दराने दोन लाख टन कांद्याची मुंबई आणि दिल्लीसह उत्तरेकडील मोठ्या शहरांमध्ये विक्री सुरू झाल्याने त्याचा कांदा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला असून, आठवड्यापासून कांद्याच्या दरात रोज घसरण होत कांद्याचे दर हे प्रतिक्विंटल ३,७०० रुपयांच्या आत आल्यामुळे आठ दिवसांत १,२५० रुपयांची घसरण झाली आहे.
मागील आठवड्यात २७ ऑक्टोबरला उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ५,८२० रुपये, तर सरासरी ४,९०० रुपये इतका दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असताना राजस्थान, मध्य प्रदेश आणि इतर पाच राज्यातील निवडणुका समोर ठेऊन
Nashik | धक्कादायक! जिल्ह्यात ५ वर्षांपासून मुलींच्या जन्मदरात घट; चिंताजनक आकडेवारी समोर
केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधील दोन लाख टन कांदा पंचवीस रुपये किलो या दराने किरकोळ बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निर्यात होणाऱ्या कांद्याच्या निर्यातमूल्य दर ८०० अमेरिकन डॉलर केल्याने त्याचाही परिणाम शेतकऱ्यांकडून विक्री होणाऱ्या कांद्याच्या दरावर झाला.
आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात रोज घसरण सुरूच असून, आज लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ७७७ वाहनांतून दहा हजार क्विंटल इतकी आवक झाली. त्याला जास्तीत जास्त ४, २४६ रुपये, तर कमीत कमी १,४०० आणि सरासरी ३,६५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. लाल कांद्याची २०० क्विंटल आवक झाली. त्याला ३,९०१ रुपये, ते १,१५१ रुपये आणि सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला.
चुकीच्या धोरणाचा कांद्यावर परिणाम
केंद्र शासन कांद्याबाबत चुकीचे धोरण राबवत असल्याने आता त्याचा परिणाम थेट कांद्याच्या बाजार भावावर होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा शेतकऱ्यांच्या हितासाठी फेरविचार करावा.अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेतर्फे केली जात आहे.
Maharashtra | ऐन दिवाळीच्या तोंडावर आता बस तिकिटही महागले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम