तनुजा शिंदे (विशेष प्रतिनिधी) Onion News | केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यातबंदी ह्या धोरणाच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्याच्या सर्व बाजार समितींमध्ये कांदा लिलाव हे बंद करण्यात आलेले असून, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यावर्षी पावसाने आधी शेतकऱ्यांना वाट बघायला लावत त्यांचा मोठा हिरमोड केला. त्यानंतर कसंबसं आहे त्या पाण्यावर शेतकऱ्यांनी पीक उभे केले तर, त्यातही अवकळी आणि गरपीटीचा बसलेला तडाखा यामुळे शेतकऱ्यांचे आहे ते पीकही डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाले. नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे यात कांदा व द्राक्ष पीकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी आधीच हतबल झालेले असताना, यातच आता केंद्राने कांदा निर्यात बंदी लागू केली आहे.
यामुळे शेतकरी तसेच व्यापारी आता प्रचंड संतप्त झाले असून, या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिकमधील सर्व बाजार समित्या ह्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता संतप्त शेतकऱ्यांनी थेट केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी थेट राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यावा म्हणजे त्यांचा राजीनामा फेटाळला जाणार नाही. अशी मागणी देवळा तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. Onion News
Breaking | चांदवडमध्ये सोमवारी शरद पवारांच्या उपस्थितीत ‘रास्ता रोको’
यावेळी शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार तसेच लोक प्रतिनिधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा व्यक्त केली. यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी ‘राज्य सरकार हे राज्यात अस्तित्वात आहे का ?’हे सरकार फक्त भांडवल जमा करायला जागे आहे. ह्या सरकारने गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं ?.असा सवालच यावेळी ह्या संतापलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
सरकारने आमच्या मानेवर पाय ठेवला आहे. आधीच दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असताना, शेतकऱ्यांना अजून खड्ड्यात घालण्याचे काम हे ह्या सरकारने केलेले आहे. सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले पाहिजे, तर हे सरकार अजून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडत आहेत.Onion News
हे सरकार पाकिस्तानच्या अतिरेक्यांवर जसे सर्जिकल स्ट्राईक करते, त्याप्रमाणे हे सरकार शेतकऱ्यांच्या मानेवर पाय देत आहेत. यापूर्वीच शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे प्रचंड नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. कांदा उत्पादक शेतकरी हे अगदी मेटाकुटीला आलेले असताना सरकार हे अशा सुडप्रवृत्तीने काही निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडत आहेत. हे राज्य सरकार अस्तित्वात आहे का? असाच प्रश्न आम्हाला पडला आहे. ह्या सरकारने शेतकऱ्यांना फक्त खड्ड्यात घालण्याचे काम सरकार करत आहे. – शिवाजी पवार (कांदा उत्पादक शेतकरी)
Onion News | कांदा पिकावर ‘या’ रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता; शेतकरी चिंतेत
कांदा निर्यातीबाबत सरकारने अतिशय घाण निर्णय घेतलेला आहे. तसेच यापूर्वी कांद्याला थोडाफार भाव मिळत होता मात्र आता सरकारच्या ह्या निर्णयाने कांद्याचा खर्चही निघत नाहीये. कांदा जास्त दिवस साठवुन ठेवल्याने उन्हाळ कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. यातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असताना सरकारने निर्यतबंदीचा निर्णय घेतलेला आहे. तर सरकारने निर्यातबंदी मागे घ्यावी अशी आमची मागणी आहे. – युवराज मोरे (कांदा उत्पादक शेतकरी)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम