कांदा उत्पादक भडकले ; मोठ्या जनअंदोलनाची तयारी सुरू

0
4

नाशिक प्रतिनिधि : नाशिक जिल्ह्यात पूर्व भागातील संपूर्ण तालुक्यातील जनतेच मुख्य पीक असलेला कांदा सध्या शेतकऱ्यांना रडवतोय. याच मुख्य कारण बदलता निसर्ग व सतत बदलते सरकारी धोरणं.याच बदलत्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्याच लोण आज कांदा, द्राक्ष, ऊस उत्पादकांपर्यंत पोचलय.

चालू हंगामात पोळ व रांगडा कांदा (आगाप व लेट खरीप)अतिवृष्टी, रोगराईने जिथं शंभर ते सव्वाशे क्विंटल निघायचा तिथं २५ ते ३० क्विंटलच निघाल्याने भाव मिळूनही शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलच नाही. नंतर रब्बीत येणारा उन्हाळ कांदा ही सुरुवातीला अतिवृष्टी ने रोप खराब होऊनही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून दुबार रोप टाकली यात वेळ गेल्याने परिणामी लागवडी जानेवारी अखेर पर्यंत लांबून लेट झाल्याने उत्पादन खर्च तिप्पट चौपट वाढूनही अपेक्षित उत्पादन निघालच नाही.

वाढलेली उष्णता व अतिवृष्टी ने जमिनीत तयार झालेल्या बुरशीजन्य रोगांमुळे कांद्याची टिकवन क्षमता कमालीची घटल्याने शेतकऱ्यांना तो बाजारात विकण्याशिवाय पर्याय राहिला नसतांना बाजारभाव नीचांकी ७ ते ८ पर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा पेच उभा ठाकलाय. निसर्ग कुणाच्याच हातात नाही पण सरकार मुद्दामहून आडकाठी करत नेहमीच शेतमालाचे भाव पाडतंय यातून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला असून शेतकरी आरपारची लढाई लढण्यास तयार झाला आहे.

यातूनच कांदा उत्पादक असलेल्या येवला, सिन्नर, सटाणा, कळवण, चांदवड, नांदगाव, मालेगाव तालुक्यातील शेतकरी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रांत व तहसीलदार यांना दिनांक ३० मे२०२२ रोजी याबाबत निवेदन देणार असून सरकारने ठोस पाऊल न उचलल्यास जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असे कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समिती ने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here