Skip to content

Onian farmer : चाळीतील कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ; शेतकरी देशोधडीला


Onian farmer : अवकाळी पाऊस व गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा प्रंचड प्रमाणात खराब झाला होता, तशाही परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अवा्चा सव्वा खर्च करून कांदा काढून तो चाळीत साठवला .परंतु एक दिड महिन्यातच चाळीतला कांदा सडल्याने त्याला फावड्याने उचलून फेकण्याची वेळ कांदा उत्पादक तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे . (Onian farmer )

Agriculture news: खतांच्या किमती वाढल्यात ? वाचा नेमक काय झाला निर्णय

सावकी (विठेवाडी) ता देवळा येथील शेतकरी धनंजय बोरसे यांच्या चाळीतील सोडलेला कांदा (छाया – सोमनाथ जगताप )

यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे नगदी पीक असून, मिळेल त्या भावाने महागडे कांदा बियाणे खरेदी करून उन्हाळी कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. ऐन काढणीच्या वेळेत ढगाळ वातावरण ,आवकळीनेपाऊस व गारपीट यामुळे शेतकरी हवालदिल झाला .

उन्हाची तमा न बाळगता मोठ्या काबाड कष्टाने कांद्याची साठवणूक केली . मात्र महिना भराच्या आत तो खराब होत असल्याने खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सद्या मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक असून,भाव कवडीमोल मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मागील लाल कांद्याचे अनुदान अद्याप मिळाले नाही. त्यात उन्हाळी कांद्याला भाव नाही .चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी अशा ह्या दुहेरी तिहेरी संकटात सापडला आहे. शासनाने याची दखल घेऊन कांद्याला किमान हमी भाव जाहीर करावा ,व जाहीर केलेले अनुदान तात्काळ अदा करून दिलासा द्यावा , अशी मागणी जोर धरू पहात आहे . Onian farmer

तालुक्यातील विठेवाडी शिवारातील धनंजय बोरसे यांनी एप्रिल महिन्यात साठवणूक केलेला खराब झाल्याने तो फावडे लावुन फेकण्याची वेळ आली आहे.

१०/१२ एकर कांदा लागवडीसाठी व चाळीत साठवणूक करे पर्यंत लाखो रुपये खर्च केला, महिन्या दिड महिन्यातच चाळीतला संपूर्ण कांदा सडल्यामुळे त्याला मजुर लावुन उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे ३० गुंठे टोमॅटो ची लागवड केली .त्यासाठी ७०/७५ हजार रुपये खर्च करून पदरात काहीच पडले नाही तोही मजुर लावुन‌‌‌ उकिरड्यावर फेकण्याची पाळी आली. शेतकऱ्यांना आत्महत्या क‌रण्याशिवाय पर्याय नाही
– धनंजय बोरसे ,कांदा उत्पादक शेतकरी ,सावकी -विठेवाडी

आजच्या घडीला कोणत्याच शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडला असुन, अवकाळी पाऊस व गारपीट मुळे तो अधिच परेशान असतांनाच त्याने लाखो रुपये खर्चून पिकवलेला कांदा चाळीत सडतो आहे. शासनाने कांद्यासाठी अनुदान जाहीर केले परंतु अद्याप बळीराजाच्या पदरात पडले नाही , त्यालाही पाय फुटून ते व्यापाऱ्यांच्या व दलालांच्या घशात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुबेर जाधव( संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!