देवळा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सरकारी कांदा धोरणं, खत खाद्य, औषध फवारणी, मशागती व मजुरी यांच्या तुलनेने शून्य असल्याने कांदा उत्पादक दिवसेंदिवस देशोधडीला लागत चालला आहे. त्यावर उपाय योजना म्हणून विधानसभेत मंत्री महोदयांनी “कांदा बाजार भावातील घसरण व उपाय योजना” समिती गठीत केली आहे.
व्हिजन ऍग्रो प्रोड्युसर कंपनीला फ़ॉरेन डेलिगेशन मंडळाची भेट
या संदर्भात या समितीने शेतकऱ्यांमध्ये बसून उपाय योजना व शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जवळून जाणीव करून घेत अहवाल द्यावा. या मागणीसाठी देवळा तालुका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील माळवाडी येथील युवा शेतकऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार विजय बनसोडे यांना आज गुरुवारी( दि २)रोजी निवेदन देण्यात आले .
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतप्त भावना लक्षात घेता केंद्र सरकारने लाल कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू केली खरं; पण खरेदीचा भाव ६०० ते ८५० रुपये पाहता ही खरेदी कांदा उत्पादकांसाठी कुठल्याही प्रकारची योग्य नाही, त्याचबरोबर नाफेड कांदा खरेदी निकषही जिकरीचे असल्याचे म्हण्टले आहे . कांदा उत्पन्न खर्च लक्षात घेता कांद्याला २००० रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिकचा कायमस्वरूपी भाव जाहीर करावा, अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारे पर्यंत खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांचे हप्ते वसुली बंद करावी, किंवा चालू कर्ज हप्ते केंद्र व राज्य सरकाने भरावे.
अशीही मागणी निवेदनामार्फत केली आहे. यावेळी अविनाश बागुल , किरण शेवाळे, अक्षय शेवाळे, विकी बच्छाव, मुन्ना बागुल, रोहन बागुल, रमेश बागुल, किरण बच्छाव, वैभव बच्छाव, हेमंत बागुल, डिगु बागुल, गोविंद बागुल, शहाणा बागुल, सुनील गांगुर्डे, संदीप शेवाळे, प्रदीप शेवाळे, आबा गुंजाळ, रमेश बागुल, सतीश बागुल, राजेंद्र बच्छाव आदी युवा शेतकरी उपस्थित होते.
कांदयाला भाव नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडा असून, कांदा उत्पादित करण्यासाठी ज्या पूरक घटकांची गरज भासते त्यात खत खाद्य, ट्रॅक्टर, डिझेल, औषध फवारणी यांच्या किमती ८० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात याव्यात.
– अविनाश बागुल ,कांदा उत्पादक शेतकरी ,माळवाडी ता देवळा .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम