कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; टेहरे येथे शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

0
11

मालेगाव : येथील टेहरे हुतात्मा चौक याठिकाणी शेतकरी संघटने कांदा प्रश्नावर सरकारचे लक्षवेधत राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाले पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला.

सकाळी ११वाजता ‘हुतात्मा चौक’ येथील स्मारकाला वंदन करून तसेच शाहिदांना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. हुतात्मा चौकापासून महामार्गापर्यंत केंद्रीय वाणिज्य, व्यापार व अन्न नागरी पुरवठामंत्री पियुष गोयल यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. महामार्गावर आल्यावर रास्ता रोकोला सुरुवात करण्यात आली. यावेळी तब्बल दोन तास चाललेल्या ह्या आंदोलनामुळे दूरपर्यंत वाहतूक खोळंबली होती व वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

कांदा कायम स्वरुपी आवश्यक वस्तू कायद्याच्या सुचितुन वगळावा, भाव स्थिरीकरण निधी योजना रद्द करावी असे मत बळीराज्य पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या विभाग प्रमुख सौ. सीमा नरोडे यांनी मांडले.

तसेच गत वर्षी देशाच्या वाणिज्य व व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्याकडे असलेल्या परराष्ट्रात देशातील मालाची निर्यात वाढविण्याची जवाबदारी असतांना तिचे निर्वाहान करण्या ऐवजी त्याच्या उलट निर्णय घेऊन निर्यात थांबवत अनेक देशांशी झालेले वाणिज्य करार मोडले त्यामुळे भारत सरकारच्या निर्यात धोरणाची विश्वासह्रार्याता संपुष्टात आणली त्यामुळे भारताचा कांदा घ्यायला बांगलादेश, यमन व अरब देश कांदा आर्यात करायला तयार नाहीत त्यामुळे आज कांदा विषयीचे संकट निर्माण झाले आहे. कांदा आयात करणारे देश आता कांदा उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे भविष्यात कांद्याचे संकट अजून गडत होणार आहे. ४० % कांदा निर्यात करणारा आपला देश आज ७.५% निर्यातीवर आला असून चुकीच्या निर्णय घेणाऱ्या पियुष गोयल या राष्ट्र विरोधी मंत्र्याला गावबंदी करण्याचे आव्हान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील बहाळे यांनी केले.

कांद्याच्या किंमती कमी झल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही यांवर बोलता प्रभाकर शेवाळे यांचे बोलता अश्रू अनावर झाले. टेहरे ग्रामस्थांनी आंदोलनात विशेष सहभाग घेत सहकार्य केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे शशिकांत भदाणे, अर्जुन बोराडे, बाळासाहेब हिंगे, शेखर पवार, निखिल पवार, प्रा. के. एन.अहिरे, प्रा. अनिल निकम, शेखर पगार, प्रभाकर शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, अरुण पाटील, डॉ तुषार शेवाळे, राजेंद्र भोसले, संदीप पाटील, आर डी निकम, देवीदास पवार, संतु जामरे, बाप्पू पगारे, गुलाब सिंघ, आत्मराम पाटील, रामनाथ ढिकले, भानुदास ढिकले, शैलेंद्र कापडणीस, बाळासाहेब चौधरी, संतु बोराडे, सुरेश जाधव, किरण गवारे, बाबसाहेब गुजर, यशवंत आथरे, अशोक भंडारे, तानाजी बोराडे, त्रंबक गायकवाड, माधव रोटे, माणिकराव निकम, बाळासाहेब शेवाळे, केदु बोराडे, वसंत खंडांगळे, किसन शिंदे,बाळासाहेब धुमाळ, तानाजी झाडे आदी विविध भागातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here