देवळा फाटा – कारने दुचाकीस मागून धडक दिल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू

0
27

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : मालेगाव तालुक्याच्या सौंदाने शिवारातील मुंबई-आग्रा महार्गावर कारने दुचाकीस दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवळा फाट्यावरील तुळजाई हॉटेलसमोर हा अपघात घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सौंदाने शिवारातील बंधारपाडा वस्तीत राहणारे संजय वसंत पवार हे आपल्या दुचाकीवरून (MH 15 DE 6991) नातेवाईक रामदास दादाजी पवार यांच्यासोबत सौंदाने गावाकडे जात असतांना, मागून आलेल्या अल्टो कारने (MH 41 C 887) दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. यात अपघात होऊन संजय पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर रामदास पवार हे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी मृताचे नातेवाईक विठ्ठल अंबर मोरे यांच्या फिर्यादीनुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here