रविवार कारंजासह चौकात CCTV चा असणार वॉच; प्रभाग तेरासाठी शासनाकडून एक कोटीचा निधी

0
44

Nashik |आता शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. रविवार कारंजासह प्रभाग क्रमांक तेरामधील मुख्य बाजारपेठेसह चौक परिसरात यापुढे महत्त्वाच्या परिसरावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. आरके सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आणि स्व. सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सचिन भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रभागातील विकासकामांकरिता निधीची मागणी केलेली होती. ही मागणी तात्काळ मान्य करत शासकीय निधीतून प्रभागात तब्बल एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

DS Baba: ‘तुझा देवळा आता तालुका झाला’…; आठवणीतील डॉ. डी. एस. बाबा

महापालिकेत प्रशासक राजवट असल्याने शहरातील विकासकामे खोळंबलेली आहेत. दरम्यान, प्रभागातील विकासकामे व्हायला हवे याकरिता भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे विकास निधीची मागणी केलेली होती. राज्यातील महानगरपालिकांना मूलभूत सोयीसुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत अटी आणि शर्तीच्या अधीन राहून शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात येते. विशेषतः या निधीचा खर्च संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. त्यामुळे सदर प्रकल्पा अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या कामांना प्रकल्प खर्चाच्या मर्यादेत सक्षम प्राधिकाऱ्यांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असल्याची खातरजमा जिल्हाधिकारी यांनी करून घ्यावी. त्यानंतर जिल्हाधिकारी कामास प्रशासकीय मान्यता देतात. यानुसारच प्रभाग तेरामध्ये एक कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. प्रभागातील चौकाचौकांमध्ये येत्या काही दिवसांत CCTV बसवले जाणार आहेत. ८० लाख CCTV तर २० लाखांचे बेंचेस प्रभागात बसवले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असता त्यास तात्काळ मंजुरी दिल्याने सचिन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत.

Gas price: सणासुदीत गॅसचा भडका ! सलग दुसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडर महागला

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार

प्रभाग तेरामध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत, ते मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दादा भुसे यांच्या मदतीने प्रयत्न आहेत. रहिवासी व व्यापारीवर्गास मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरवठा करणार आहोत. यांसह भविष्यात चाळीस वर्षे झालेल्या होळकर पुलाची डागडुजी करून सुशोभीकरणाची मागणी आहे. तसेच भद्रकाली परिसर, दहीपूल, भद्रकाली पटांगण, गाडगे महाराज आश्रम या परिसरातही सीसीटीव्हीसाठी कार्यान्वित करणे अत्यावश्यक असल्याने यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी प्रस्ताव देणार आहोत.
सचिन भोसले, अध्यक्ष स्व. सुरेखाताई भोसले, सामाजिक प्रतिष्ठान


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here