Nagpur Crime: १० वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय वृध्द व्यक्तीचा अत्याचार, परिसरात उसळला संताप

0
45

Nagpur Crime : नागपूरमधील एक संतापजनक घटना घडली आहे. एका ६५ वर्षीय वृध्द म्हाताऱ्याने  शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

Breaking News: सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे निधन

दरम्यान, शेजाऱ्याची नजर त्याच्यावर पडल्याने ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.

आता या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

मोहम्मद इद्रीस शेख (वय ६५ वर्षे) असे आरोपीचे नाव असून तो यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. इद्रिस घरी सूत काततो. त्याला एक मुलगा आणि सूनही आहे. त्याचा मुलगा फळविक्रेता आहे. तो काही काळापासून भाड्याच्या घरात राहत होता.

Wardha Crime : तरुणीवर जीवघेणा हल्ला,पोलिसांकडून आरोपीला बेड्या

घरमालकाशी त्याची चांगली ओळख होती आणि त्याचा गैरफायदा घेतला. घरमालकाच्या १० वर्षांच्या मुलीशी त्याचे नेहमीच जवळीक होते. ती त्याचा नातीच्या वयाची असल्याने कोणालाही संशय आला नाही.

मंगळवारी रात्री ९.३० वाजता त्याने मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने गच्चीवर नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. तो हे घाणेरडे कृत्य करत असताना घरातील दुसऱ्या भाडेकरूने त्याला पाहिले.

दुसऱ्या भाडेकरूला पाहताच तो घाबरला आणि आरोपीने तेथून पळ काढला. याबाबत दुसऱ्या भाडेकरूने घरमालकाला याची माहिती दिली. घरमालकाने मुलीला विचारणा केली असता तिने रडत आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले.

अखेर तिच्या पालकांनी यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. मुलीचा पालकांकडून यशोधरानगर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. इद्रिसबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here