‘ओला’च्या सर्वात स्वस्त ई-स्कूटरची विक्री उद्यापासून, फीचर्स आहेत शानदार !

0
31

मुंबई – गेल्या काही दिवसांत ई-बाईक्सला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळेच भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केट सध्या तेजीत आहे. त्यातच पेट्रोलच्या वाढत्या दरामुळेही ई-बाईक्सची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

हाच ग्राहकांचा वाढता कल पाहून इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत अनेक दिग्गज कंपन्या आता उतरल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ‘ओला’ने स्वातंत्र्यदिनी ‘ओला एस 1′ (OLA S1) ही ई-स्कूटर लाँच केली होती.

‘ओला’ची ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असून अवघ्या ९९ हजार रुपयांत ही ई-स्कूटर उद्यापासून बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहे. याआधी ‘OLA S1 Pro’ या ई-स्कूटरचे आतापर्यंत ७०,००० युनिट्स विकले गेले आहेत. त्यामुळे ‘OLA S1’ ही ई-स्कूटरही ‘OLA S1 Pro’ या स्कूटरप्रमाणेच डेव्हलप करण्यात आली आहे. ग्राहकांना ही स्कूटर दैनंदिन गरजांसाठी वापरता येईल, शिवाय ह्यात वजनदार साहित्यही वाहून नेता येणार आहे.

ही आहेत ‘OLA S1’ची फीचर्स !

  • या ई-स्कूटरमध्ये ३kWhची इलेक्ट्रिक मोटर वापरली आहे. त्यामुळे ही स्कूटर पूर्ण चार्ज झाल्यावर तब्बल १४१ किमी अंतर इतकी कापू शकते.
  • स्कूटरचा टॉप स्पीड ९५ kmph असल्याचा दावा कंपनीने केला आहे, तसेच ह्या स्कूटरमध्ये इको, स्पोर्ट आणि नॉर्मल अशी तीन मोड आहे.
  • ह्या स्कूटरमध्ये कंपनीने जारी केलेले सर्व सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात. तसेच नवीन ‘Move OS 3’ सॉफ्टवेअरचाही यात समावेश आहे.
  • ही स्कूटर जगातील सर्वात मोठा दुचाकी कारखाना असलेल्या ‘फ्युचर फॅक्टरी’त तयार झाली आहे.
  • एलईडी डीआरएल, संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व एलईडी टेललाइटसह एलईडी हेडलॅम्प असतील.
  • जेट ब्लॅक, कोरल ग्लॅम, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाइट व निओ मिंट, अशा पाच रंगांमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here