प्रेमीयुगलांचे प्रेमाच्या नावाखाली ‘अश्लिल’ चाळे ; कॅफे हाऊसवर पोलिसांच्या कारवाईने ‘ब्रेकअप’

0
61

देवळा : प्रेमात गुंग असलेल्या जोडप्यांना जरा त्रास सोसावा लागत आहे. कारण ग्रामीण भागातील जोडप्यांना आता शहरी भागातील जोडप्यांचे अनुकरण करावेसे वाटत, त्यांनाही कॅफेला जावून एकत्रित क्षण घालावेसे वाटता अनेक युवक सांगता की आम्हाला साधे बोलता देखिल येत नाही हा तर आमच्या हककांवर गदा आहे. मात्र प्रेमाच्या आड अश्लिल चाळे मोठ्या प्रमाणात शहरात वाढले आहेत

तालुक्यात सद्या अल्पवयीन तरूण तरूणी प्रेमात पडून घरातून पळून जाण्याच्या घटना सातत्यने वाढत चालल्यामुळे देवळा पोलिसांचे दामिनी पथक सक्रिय झाले असून, देवळा शहरातील शिवस्मारक परिसरातील उद्यान, बस स्थानक परिसरात दोन कॅफे हाऊसवर शनिवारी( दि ८) रोजी कारवाई करण्यात आली असून नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तालुक्यातील नागरीक व पालकांच्या आलेल्या तक्रारींची पोलिसांनी दखल घेतली व महाविद्यालय सुटल्या नंतर दामिनी पथकाने शिवस्मारक उद्यान तसेच बसस्थानकावर जाऊन शंका आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींची चौकशी करून त्यांना सक्त ताकिद देण्यात आली. यानंतर दामिनी पथकाने बसस्थानक परिसरात असलेल्या दोन कॅफे हाऊसवर कारवाई केली.

यावेळी कॅफे हाऊस मध्ये विशिष्ठ हेतूने आडोसा तयार करण्यासाठी लावलेले पडदे कॅफे हाऊसच्या संचालकांना काढण्यास सांगून यापुढे कॅफे हाऊसमध्ये पडदे लावू नये असा आदेश देण्यात आला. यापुढे नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात आली. देवळा पोलिसांनी अशा प्रेमी युगुलांवर कारवाई केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्यांना चाप लागला असून हि कारवाई यापुढेही अशीच सुरू ठेवावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलिस नाईक ज्योती गोसावी, ऋतिका कुमावत, माधुरी पवार, हवालदार चंद्रकांत निकम आदींच्या पथकामार्फत हि कारवाई करण्यात येत आहे.

मोबाईल व सोशल मिडीयामुळे घरातून पळून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. याबाबत पालकांनीच आता सजग होण्याची गरज आहे. आपल्या पाल्याच्या शाळेची वेळ, त्यांचे मित्र मैत्रिणी याबाबत पालकांनी अधून मधून चौकशी केली पाहीजे तसेच आपल्या पाल्याच्या वर्तणुकीत बदल दिसून आल्यास त्याच्याशी संवाद साधला पाहीजे. ह्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तालुक्यात दामिनी पथक सक्रीय केले आहे.
दिलिप लांडगे ( पोलिस उपनिरीक्षक देवळा )

पोलिसांनी केलेली कारवाई स्तुत्य असून यापुढेही अशी कारवाई पोलिसांनी सुरू ठेवावी. तालुक्यात अल्पवयीन मुला मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून या कारवाईमुळे अशा घटनांना आळा बसेल. देवळा नगरपंचायतीने शिवस्मारक उद्यान सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बंद ठेवावे.
_ राजेश आहेर ( सामाजिक कार्यकर्ता, देवळा )


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here