नुपूर शर्मा वादग्रस्त वक्तव्य प्रकरण; पुतळा भर चौकात लटकवल्याने व्यक्त होतेय चिंता

0
11

द पॉईंट नाऊ ब्युरो : भारतात एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकतेच मुस्लिम धर्माच्या प्रेषितांबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे भाजपच्या नुपूर शर्मा यांविरोधात जोरदार निदर्शने देशभर सुरू आहेत. आणि आता तर थेट भर चौकात त्यांचा पुतळा फाशी दिलेल्या अवस्थेत दाखवण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक मधील बेळगाव येथे मशिदीजवळ नुपूर शर्मा यांचा पुतळा भर चौकात फाशी दिलेल्या अवस्थेत टांगण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

देशभरात सध्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समुदायाद्वारे निदर्शने सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्ये तर याला हिंसक वळण लाभले. यामुळे देशातील शांतता पूर्णतः बाधित झाल्याचे दिसून येत आहे. तर उत्तर प्रदेशात याप्रकरणी हिंसक निदर्शने करणाऱ्या 300 हुन अधिक आंदोलकांवर कारवाई करण्यात आली आहे.

आता बेळगाव येथे याप्रकारे नुपूर शर्मा यांचा पुतळा लटकवण्यात आल्याने, वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सदर लटकवण्यात आलेल्या पुतळ्याचे फोटो ट्विट करतांना मुस्लिम समुदायास आवाहन केले आहे की, हे सीरिया, इराक किंवा इराण नाही. या प्रकाराबाबत लवकर कारवाई झाली नाही, तर पुतळ्याची जागा खरे लोक घेतील. अशा प्रकारच्या वर्तनाविरोधात उभे राहण्याची वेळ आहे. तर माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद याने ट्विट करतांना म्हटले आहे की, हे 21 वे शतक आहे. या प्रकारावर विश्वास बसत नाही. आता बेळगाव मध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत काय पाऊल उचलले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद जगभरात उमटताना दिसून येत आहेत. याबाबत इस्लामिक देशांनी देखील आपला निषेध भारताकडे नोंदवला होता. आणि जगातील काही देशांमध्ये यावरून निदर्शने देखील सुरू आहेत. भारताने मात्र याबाबत आपले स्पष्टीकरण नोंदवताना भारत कोणत्याही धर्माच्या विरोधात किंवा कोणत्याही धर्माच्या विरोधात वक्तव्य सहन करत नाही असे म्हटले आहे. तर भाजपने नुपूर शर्मा यांनी त्वरित निलंबित देखील केले होते.

जगभरात होत असलेल्या या विरोध प्रदर्शनामुळे भारताविरोधात हे षडयंत्र सुरू असल्याचे अनेकांनी म्हटले. तर हे पाकिस्तानच करत असल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे चिंता व्यक्त केली जात असून, हे वातावरण कधी निवळेल याची सारे वाट पाहत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here