राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन

0
42

देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रामेश्वर (दत्तक गाव) ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर किशोर सागर जलाशयाजवळ मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन करण्यात आले.

जलप्रदूषण टाळून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाचे प्राचार्य मा.हितेंद्र आहेर आणि मविप्र संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मा.विजय पगार यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम राबविण्यात आला. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत लहान मोठ्या अशा जवळपास चौदाशे गणेशमूर्तींचे व एक ट्रॅक्टर ट्रॉली निर्माल्याचे संकलन करण्यात आले.

दोन दिवस अगोदरच विविध समाज माध्यमातून जलप्रदूषण रोखण्यासाठी व जलाशयातील पाणी ओसरल्यावर मूर्तींची होणारी विटंबना टाळण्यासाठी संकलन करणे आवश्यक असल्याचे पटवून देण्यात आले होते. सदर उपक्रमास देवळा शहर व परिसरातील विविध गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक नागरिकांचे समुपदेशन करून संकलनास प्रोत्साहन देत होते.

संकलनस्थळी देवळा एज्युकेशन सोसायटीच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मालतीताई आहेर, शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी, ह. भ. प. सुखानंद महाराज, गोविंदआप्पा पगार,भगवान आहेर, पंकज जाधव, अनिल भामरे, सतीश आहेर व अनेक नागरिकांनी भेटी देऊन उपक्रमाचे कौतुक केले. मूर्तींचे जतन व संवर्धन करण्याच्या हमीवर इच्छुकांना जवळपास ४५० मूर्तींचे दान करण्यात आले. उर्वरित सर्व मूर्तींचे मूर्तिकारांना पुनर्वापरासाठी मोफत देण्याचे नियोजन आहे.

संपूर्ण उपक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व देखरेख यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक व मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ.डी. के. आहेर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.एस. डी ठाकरे, वृक्षमित्र डॉ. सुनील आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रम यशस्वी करण्यात रामेश्वर गावाचे सरपंच केवळ गांगुर्डे, उपसरपंच रघुनाथ पगार, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक खैरनार, कार्यक्रम अधिकारी डॉ.जयमाला चंद्रात्रे, प्रा. राकेश घोडे, सेवानिवृत्त प्रा. रवींद्र शिरसाठ, प्रा. अशोक गुजरे, प्रा. उमाकांत शेळके, प्रा. निलिमा पाटील यांनी योगदान दिले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहेर अथर्व नरेंद्र, देवरे रोशन बाबुराव, पगार मनोज हरी, गुंजाळ मयूर एकनाथ, निकम कल्पेश साहेबराव, देवरे आदित्य आनंदा, काकविपुरे हृतिक वामन, देवरे साक्षी प्रमोद, भदाने मयुरी, नवले सारिका, निकम मयुरी, शिरसाठ रविना, गुंजाळ कोमल संजय, महाले पूजा सीताराम, पवार मनीषा, शिंदे मयुरी, पवार दिक्षा, गायकवाड रोहिणी, बर्वे विजया प्रत्यक्ष मदत करीत होते.

महाविद्यालयाचे कर्मचारी गोरख कारवाळ, भरत कांदळकर, रघु नवरे, उल्हास गुजरे, बाबाजी आहेर, गोविंद आहेर, नंदू आहेर, मुन्ना बच्छाव, बाबा आहेर, जयेश निकम, कैलास गांगुर्डे इ. सहभाग घेतला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here