आता चलनी नोटांवर छापले जाणार टागोर आणि कलामांचेही फोटो?

0
34

द पॉईंट नाऊ ब्युरो : आपल्या देशात चलनात असणाऱ्या नोटांवर सध्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचाच फोटो असतो. मात्र आता रिझर्व्ह बँक चलनातील नोटांवर महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे देखील फोटो छापण्याच्या विचाराधिन असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून चलनात असलेल्या नोटांवर केवळ गांधीजींचा फोटो होता. यादरम्यानच्या काळात अनेक वेळा विविध महान नेत्यांचे फोटो चलनात असलेल्या नोटांवर छापण्याची मागणी केली गेली. मात्र आता भारतीय वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर आणि भारताचे माजी राष्ट्रपती तथा महान शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे देखील फोटो छापण्याचा विचार करत आहे.

यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने गांधीजी, टागोर आणि कलाम यांचे वॉटरमार्क केलेले फोटो दिल्ली येथील आयआयटीच्या प्राध्यापकांकडे पाठवलेले आहेत. आता दोन संचांमधून निवडून भारत सरकारकडे अंतिम विचारासाठी फोटो सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

आता याबाबत नक्की काय निर्णय होणार? आणि कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here