प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला

0
78

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. रश्दी हे न्यूयॉर्कमधील शिटाक्वा इन्स्टिट्यूशन येथील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.

रश्दी बोलत असताना अज्ञात हल्लेखोर अचानक त्यांच्या दिशेने धावत गेला आणि रश्दी यांना जोराने ठोसा मारून पळाला, असे एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी एकाने हा व्हीडिओ चित्रीत केला असून यामध्ये घटनेनंतर उडालेला गदारोळ दिसून येतो.

सलमान रश्दी यांचा जन्म भारतात झाला आहे. १९८१ साली प्रकाशित झालेल्या “मिडनाईट चिल्ड्रन्स” या पुस्तकानंतर ते प्रसिद्धीस आले. या पुस्तकाच्या जगभरात लाखो प्रति विकल्या गेल्या. ते साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च अश्या बुकर पुरस्काराने सन्मानित आहे. त्यादरम्यान त्यांनी लिहिलेल्या “द सॅटेनिक व्हर्सेस” या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला, त्यांना धमक्या येत होत्या. खासकरुन मुस्लिम समाजात त्यांच्या या पुस्तकामुळे वाद झाला होता. विशेष म्हणजे एका धार्मिक नेत्याने त्यांच्या हत्येचा फतवा देखील काढला होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here