Crime News | पुणे येथील येरवडा कारागृहातून पुन्हा एक कैदी पळाल्याची घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड आशिष जाधव हा येरवडा कारागृहामधून पळाला आहे.
त्यामुळे आता ह्या कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. कुख्यात गुंड आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात २००८ पासून पुणे येथील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.
आशिष जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम दिलेलं होतं. दरम्यान, काल दुपारच्या सुमारास तुरुंग अधिकारी कैद्यांची मोजणी करताना त्यांना आशिष जाधव हा दिसला नाही.
रेशन विभागातील या कामादरम्यानच, तो पळाल्याचा संशय आहे. दरम्यान, आता या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
Nashik news | सभांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे नागरिकांना आवाहन
संवेदनशील अन् कडक सुरक्षाव्यवस्थेतून निसटला
काल दुपारच्या सुमारास कारागृहामधील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली असता, त्यावेळी अशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळला नाही.
त्यामुळे आशिष जाधव हा फरार झाल्याचं लक्षात आलं. राज्यातील सर्वात संवेदनशील व कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ह्या येरवडा करागृहातून तो पळाल्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Crime news | हातपाय धुण्यासाठी धरणात गेले अन दोन दिवसांनी सापडला मृतदेह
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम