The point now -Swati kadam
आपण आपल्या चेहरा चमकवण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी बाहेरचे केमिकल प्रॉडक्ट वापरतो आपण ब्लीच करतो फेशियल करतो किंवा इतर कुठल्या गोष्टी वापरतो मग फेस मास्क, असो किंवा फेस सिरम असो यांनी काय होतं बाहेरचे जे काही प्रॉडक्ट्स असतात. त्यामध्ये केमिकल असतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची हळूहळू तुमच्या चेहऱ्याची खरी चमक जाण्यास सुरुवात होते. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घरगुती पद्धतीने घरातल्या घरात तुम्ही तुमचा फेस ग्लोविंग करू शकता चला तर जाणून घेऊया
ग्लोइंग स्किन टिप्स: ग्लोइंग स्किनसाठी महिला पार्लरकडे वळतात. आयब्रोज करायच्या असतील किंवा फेशियल, क्लीनअप आणि ब्लीच तुम्ही फक्त ब्युटी एक्स्पर्टकडे जाता घरी असताना देखील असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुमच्या चेहऱ्याचे लाड केले जाऊ शकतात. भाज्यांचा राजा बटाटा तुम्ही घरगुती पद्धती म्हणून वापरू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पार्लरसारखी चमक येईल
ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी आता तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही तर तुम्ही घरच्या घरी बटाट्याच्या मदतीने चेहरा ग्लोइंग आणि माऊ करू शकता
• दही आणि बटाट्याचा फेस पॅक बनवून तुम्ही चेहऱ्याची चमक वाढवू शकता. यासाठी तुम्हाला बटाट्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करावे लागेल नंतर त्यात चिमूटभर हळद आणि दोन चमचे दही घाला. आता ते चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. यानंतर एलोवेरा जेल लावा.
• तुम्ही तांदूळ आणि बटाट्याचा फेस पॅक देखील बनवू शकता. यासाठी तुम्हाला बटाट्याचे दोन मोठे काप घ्यायचे आहेत आणि दोन चमचे भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. आता ते एका भांड्यात काढून ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा याने तुमचा चेहरा अधिक मऊ होतो आणि चमकदार दिसतो.
• चेहऱ्याची चमक पुन्हा येण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल आणि बटाट्याचाही वापर करू शकता. तुम्हाला फक्त बटाट्याचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्याला लावा. हे सर्व घरगुती उपाय तुमच्या चेहऱ्यावरील घाण, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून तुमच्या चेहऱ्याला नवीनता देतील.
• हा फेस पॅक लावल्यानंतर त्वचेला स्वच्छ पाण्याने धुवा बर्फानी शेक द्या जेणेकरून चेहरा महू राहील आणि चेहऱ्यावरील हिट संपेल त्यानंतर एलोवेरा जेल किंवा कुठलेही साधे मॉइश्चरायझर किंवा कोरफड घेऊन त्यात दोन थेंब तेल घालून मिक्स करून घ्या जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नियमितपणे हे मिश्रण लावले . तर तुमचा चेहरा अधिक मऊ होतो हिवाळ्यामध्ये चेहरा फाटत नाही आणि चेहऱ्यावरील चमक टिकून राहते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम