झटका! गॅस सिलिंडरची ती 200 रुपये सबसिडी तुमच्यासाठी नाहीच

0
8

द पॉईंट नाऊ ब्युरो : केंद्र सरकारने नुकतीच इंधनाच्या दरात कपात केली. त्यानंतर गॅस सिलिंडरवर 200 रुपये कमी होणार असेही स्पष्ट केले. मात्र हे 200 रुपये सर्वांसाठीच कमी होणार नाहीयेत, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायला हवं.

पेट्रोल-डिझेल दर तर आसमंत गाठतच आहेत, पण आज गॅस सिलिंडरचे दर 1000 च्या वर जाऊन पोहोचलेत. या सिलिंडरवर आधी सबसिडी मिळायची. ती थेट तुमच्या बँक खात्यात जमा व्हायची. मात्र मागील काही महिन्यांपासून ही सबसिडी जमा होणे बंद झाले. मात्र नक्की सरकारने सबसिडी बंद केली की अजून काही कारण आहे, हे मात्र स्पष्ट होत नव्हते.

त्यात नुकतेच केंद्र सरकारने गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सूट जाहीर केली. तीही सबसिडी स्वरूपात. मात्र ही सबसिडी सर्वच नागरिकांना नाहीये. तर केवळ उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी ही सबसिडी आहे. आणि इतर कोट्यवधी ग्राहकांना मात्र बाजार भावानेच गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे आधीच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सामान्य माणसाला ही झळ देखील सोसावीच लागणार आहे. अर्थात, आता उज्वला योजनेतील ग्राहक सोडले, तर इतर सर्वांची गॅस सिलिंडर सबसिडी बंद करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here