देवळा : निरंजन देवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संस्थेचे माजी चेअरमन योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली.
बिनविरोध निवडून आलेले गट निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे;
सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी – उत्तम श्रावण आहेर, दगा कारभारी आहेर, दीपक मुरलीधर आहेर, प्रदीप विठ्ठल आहेर, रवींद्र रामभाऊ आहेर, राजेश महारू आहेर, सुनील गंगाधर आहेर, दीपक मांगु निकम
शांताबाई चिंधा गुजरे- अनुसूचित जाती जमाती
जिजाबाई खंडेराव आहेर, विमलबाई शिवाजी आहेर – महिला राखीव
योगेश शांताराम आहेर – इतर मागासवर्गीय गट
दादाजी मोतीराम सोनवणे- भटक्या विमुक्त जाती जमाती गट
याप्रमाणे वरील उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याकामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सुजय पोटे यांनी कामकाज बघितले . बिनविरोध निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम