अमेरिकेतील प्रसिद्ध गायक आणि प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की तो लहानपणापासून टाइप 1 मधुमेहाशी झुंज देत आहे. त्यांनी हे त्यांचा इंस्टाग्राम वर पोस्ट करत त्यांच्या फॅनशी शेअर केले. त्यांना हा आजार वयाच्या 13 व्या वर्षापासून आहे असे त्यांनी सांगितले.
निक जोनासला टाइप 1 मधुमेहाचे निदान: प्रसिद्ध अमेरिकन गायक आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवले. त्याचबरोबर प्रियांका चोप्रा आणि निक चे बॉण्डिंग इतके आहे कि ते लोकांना खूप जास्त आवडतात. त्या संख्या लोकांचे फेवरेट कपल सुद्धा आहे.
बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा शी लग्न केल्यानंतर निक अधिकच चर्चेत राहू लागला आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 2018 साली लग्नाच्या बेडीत अडकले. आज प्रियांका चोप्रा आणि निक चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. जरी चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारबद्दल प्रत्येक लहान गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे, परंतु यावेळी लोकांना हे ऐकून धक्का बसला की निक वयाच्या 13 व्या वर्षापासून आजारी आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम