NEET चा निकाल काही क्षणात होणार जाहीर; विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

0
36

शैक्षणिक प्रतिनिधी: बारावी नंतर अनेक विद्यार्थी हे मेडिकल क्षेत्रात जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी Neet ही परीक्षा महत्वाची असते. आज नीट युजी 2022 (NEET UG 2022) चा निकाल जाहीर होणार आहे. उमेदवार हा निकाल नीट युजीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात.

असा चेक करा निकाल
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर भेट द्यावी.
होम पेजवर दिलेल्या NEET UG निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
मागितलेली माहिती सबमिट करा.
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
तुम्ही डाऊनलोड करुन निकालाची प्रिटंही काढू शकता.

दरम्यान, नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच, NEET UG 2022 परीक्षा १७ जुलै रोजी घेण्यात आली होती, एकूण १८,७२,३४३ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. आज सर्व विद्यार्थ्याने भवितव्य ठरणार आहे.

720 गुणांच्या या परीक्षेत अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 टक्के आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्रवेश तज्ञांच्या मते, सामान्य श्रेणीसाठी AIQ 15% कोट्याअंतर्गत सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना 650 पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे.

परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीव्हीएससी, बीडीएससी यासह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. अर्जाच्या बाबतीत, ही देशातील सर्वात मोठी परीक्षा आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here