नवी दिल्ली – ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने अमेरिकेतील ओरेगॉन येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत रौप्य पदक जिंकले आहे. नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भाला फेकला. याच भाल्याने त्याचे नाव रौप्य पदकावर कोरले गेले.
या स्पर्धेत ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.५४ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक, तर भारताच्या नीरज चोप्राला रौप्यपदक पटकावले. झेक प्रजासत्ताक देशाच्या याकुब वालदेझने ८८.०९ मीटर भाला फेकत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. तसेच भारताच्या रोहित यादवने ७८.७२ मीटर लांब भाला फेकत स्पर्धेत दहावे स्थान मिळविले.
याआधी अनुज बॉबी जॉर्ज ह्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंतचा पदक मिळविणाऱ्या एकमेव खेळाडू होत्या. त्यांनी २००३ मध्ये लांब उडीत कांस्यपदक पटकावले होते, तर आता नीरज चोप्रा हा रौप्यपदक मिळविणारा पहिला तर दुसरा भारतीय पदकविजेता खेळाडू ठरला. नीरजने जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेतला भारताचा १९ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला.
मोदींकडून नीरजचे अभिनंदन
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजसाठी खास ट्विट करत त्याचे अभिनंदन केले आहे. ‘आमच्या सुप्रसिद्ध क्रीडापटूने पुन्हा एकदा आपलं कर्तुत्व सिद्ध केलय. नीरज चोप्रा तुला शुभेच्छा’, वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक विजेती कामगिरी हा भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी खास क्षण आहे. आगामी स्पर्धांसाठी नीरजला शुभेच्छा’ असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम