शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचावा ; जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड

0
58
देवळा येथे शरद पवार गटाच्या बैठकीत उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड,गजानन शेलार ,गोकुळ पिंगळे आदींसह पंडितराव निकम ,विजय पगार ,विलास निकम आदी (छाया -सोमनाथ जगताप)

देवळा ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर सर्वाधिक जनाधार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या गटाकडे असून ,आगामी होऊ घातलेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जो उमेदवार दिल त्याच्यामागे खंभीरपणे उभे राहून निवडून द्या व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विचार गावागावात पोहोचविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झोकून घ्यावे ,असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी आज येथे केले .

देवळा येथे शरद पवार गटाच्या बैठकीत उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड,गजानन शेलार ,गोकुळ पिंगळे आदींसह पंडितराव निकम ,विजय पगार ,विलास देवरे आदी (छाया -सोमनाथ जगताप)

देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण आढावा बैठक रविवारी दि १७ रोजी येथे पार पडली यावेळी जिल्हाध्यक्ष आव्हाड यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले .प्रास्ताविक तालुका अध्यक्ष पंडितराव निकम यांनी केले .बैठीला गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, युवक राज्य कार्यअध्यक्ष पुरुषोत्तम कडलक ,महिला जिल्हाध्यक्ष संगीता पाटील, आदी उपस्थित होते .
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संभ्रम निर्माण झाला असून ,दूर करण्यासाठी पक्ष पातळीवर दखल घेण्यात येऊन दोन्ही गटाकडून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

शरद पवार गटाकडून देवळा तालुका अध्यक्ष पदाची धुरा जेष्ठ नेते पंडितराव निकम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दोन्ही गटाकडून तालुका गाव पातळीवर आढावा बैठकांचा धडाका सुरू करण्यात आला असून, मागच्या आढवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष रविंद पगार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तर रविवारीदि १७ रोजी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .

या बैठकीला मविप्रचे तालुका संचालक विजय पगार ,उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे ,माजी संचालक डॉ राजेंद्र ब्राम्हणकार ,मविप्र चे माजी संचालक डॉ व्ही एम निकम ,साहेबराव सोनजे , रावसाहेब निकम, दिलीप पाटील ,सचिन सूर्यवंशी, राजेंद्र आहेर ,मनोज देशमुख, डॉ चंद्रकांत पाटील,उमराणे बाजार समितीचे संचालक मिलिंद शेवाळे ,रावण सूर्यवंशी, मनोज गुजरे, मयूर सोनवणे ,आर एन शिरसाट ,प्रा डी के आहेर आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here