देवळा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला नगरपंचायतीचे दुर्लक्ष; संतोष शिंदेचा आरोप

0
30

देवळा: तालुक्यात यंदा जास्त पाऊस झाल्याने देवळा गावात नगरपंचायत तर्फे कुठेही फवारणी झाली नाही त्यामुळे गावात डास मच्छर वाढले असून गावातील नागरिकांच्या आरोग्याशी नगरपंचायत खेळतेय असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संतोष (गोटू) शिंदे यांनी केला आहे.

शहरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर दूर कराव्या तसेच नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नगरपंचातीने घ्यावी असे आवाहन देखील शिंदे यांनी केले आहे. शहरात अनेक सुविधांपासून नागरिक वंचित असून त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, गावात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणे देखील गरजेचे असून तालुक्यातून येणाऱ्या महिला वर्गासाठी स्वच्छता गृह उपलब्ध नाहीत ही बाब लाजिरवाणी असून माय माउलींना अनेक त्रास सहन करावे लागतात ही बाब नगरपंचायतीने गांभीर्याने लक्षात घ्यावी असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे यांनी आपल्या वॉर्डांत आज स्वच्छता अभियान राबविले, तसेच फवारणी देखील केली यावेळी ते बोलत होते. आरोग्याच्या प्रश्नाबाबत नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ देणार नसून वेळ प्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here