देवळा ; देहूत उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषण करू न दिल्याने तेसच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या समस्या आदी मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात देवळा येथे गुरुवारी ( १६) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांना निवेदन सादर करण्यात आले. त्याच बरोबर पक्षाच्या २३ साव्या वर्धापन दिनानिमित्त शिवस्मारक परिसरात ज्येष्ठ नागरिकांचा फेटे बांधून गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. याच बरोबर महाल पाटणे येथील खेळाडूंना जि प च्या माजी सभापती उषाताई बच्छाव यांचेकडून साहित्य वाटप करण्यात आले . वाढती महागाई ,ओबीसी आरक्षण व विरोधी पक्ष करीत असलेली जनतेची दिशाभूल ,वाढती बेरोजगारी , शेतकऱ्यांच्या समस्या ,केंद्रातील सत्तेतील पक्षाच्या नेत्यांकडून महिलांविषयी वारंवार अपमानित करण्यात येणारे कृत्य व विविध वक्तव्य अशा प्रवृत्तीच्या वागणुकीविषयी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात येऊन , देवळा पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाठ ,बाजार समितीचे संचालक जगदीश पवार , शहराध्यक्ष दिलीप आहेर, महिला अध्यक्षा उषाताई बच्छाव , नगरसेविका ऐश्वर्या आहेर , नगरसेवक संतोष शिंदे, वनिता शिंदे ,वैशाली खोंडे , सचिन सूर्यवंशी, मनोज गुजरे, आकाश थोरात, चिंतामण आहेर, दत्तू आहेर, साहेबराव सोनजे , मनोहर खैरणार आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम