NCP Ajit Pawar | पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे वडगाव शेरीच्या विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आणि माजी आमदार जगदीश मुळीक देखील इच्छुक होते. तर मुळीक यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी शब्द दिल्याचा दावा त्यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले. त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषद घेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर आता मुळीकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
NCP Ajit Pawar | शिंदेसेने पाठोपाठ अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर
वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना बघून आपल्याला उमेदवारी मिळेल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिले असल्याचा दाबा भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी काल केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. परंतु पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरे यांचे नाव देखील नव्हते. दुसरीकडे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे मतदारसंघात पेच निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. त्यात आज सकाळीच सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
“दुसऱ्या यादीत नाव असेल असा मला विश्वास”- सुनील टिंगरे
सुनील टिंगरे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार असून कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातात सुनील टिंगरे यांची भूमिका वादग्रस्त राहिली होती. त्यानंतर सुनील टिंगरे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत “मला अजित पवारांनी तयारी करायला सांगितली असून वडगाव शेरीच्या जागेवर माझा दावा आहे. मला रात्री अजित पवार यांचा फोन आला होता. दुसरी यादी येईल त्या यादीत माझे नाव असेल, असा मला विश्वास आहे.” असे सुनील टिंगरे यांनी काल सांगितले होते. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते जगदीश मुळीक देखील इच्छुक असून यावर बोलताना टिंगरे यांनी “असे अनेकजण इच्छुक असतात, ते सुद्धा तयारी करतात…मैत्रीपूर्वक लढत होऊ शकत नाही इतर मतदारसंघांमध्ये देखील त्यामुळे अडचण होऊ शकते.” असे म्हटले.
NCP Ajit Pawar | अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर; ‘या’ नेत्यांना मिळाले एबी फॉर्म
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची दुसरी उमेदवार यादी पुढीलप्रमाणे:
संजय काका पाटील – तासगाव कवठेमहांकाळ
सना मलिक – अणुशक्तीनगर
निशिकांत पाटील – इस्लामपूर
प्रतापराव चिखलीकर – लोहा कंधार
झिशान सिद्दिकी – वांद्रे पूर्व
ज्ञानेश्वर – कटके शिरूर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम