द पॉईंट नाऊ ब्युरो : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीचा साथीदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा जबाब नवाब मलिक यांनी ईडीकडे नोंदवला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. आणि त्यांनी ईडीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा साथीदार सलीम पटेल हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा जबाब नवाब मलिक यांनी ईडीकडे नोंदवला आहे. यामुळे शरद पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवाब मलिक यांनी ईडीने दाऊद इब्राहिम प्रकरणी अटक केली आहे. आणि यामुळे विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आता नवाब मलिक यांनी दिलेल्या या जबाबामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम