‘NATO’ ची उभारणी केवळ रशियाची मक्तेदारी संपवण्यासाठी? की अजून काही?

1
24

द पॉईंट नाऊ विशेष : तुम्ही ‘नाटो’ हा शब्द अनेकवेळा ऐकला असेल. रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान सध्या हा शब्द वारंवार कानांवर पडतो आहे. तर हे ‘नाटो’ म्हणजे काय? हे आपण आज जाणून घेऊयात.

‘नाटो’ नक्की काय आहे?

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल.
नाटो (NATO)म्हणजे North Atlantic Treaty Organization.
NATO ही संघटना अमेरिकेच्या पुढाकाराने तयार झालेली संघटना आहे. ह्या संघटनेत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, झेक प्रजासत्ताक, तुर्की, इटली, पोर्तुगाल इ. 30 देशांची संघटना आहे.

नाटो देश एकमेकांना राजकीय, आर्थिक तसेच सुरक्षा या मुद्दयावर एकमेकांना सहकार्य करण्यासाठी बनलेली आहे.

हे फक्त बोलायची गोष्ट आहे…

सत्य असे आहे की ज्या वेळी रशिया दुसरी महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत होती, त्याच वेळी United States ला रशिया आपली जगावरची दादागिरी संपवेल असे वाटू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानीची झळ जवळपास सर्वच सहभागी देशांना बसली होती. इंग्लंड, फ्रान्स, इटली, डच, पोर्तुगिज यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या वसाहतींवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते.

इंग्लंडला देखील दुसऱ्या महायुद्धाची मोठी झळ बसली होती. त्यामुळे भारत आणि इतर वसाहतींवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. म्हणून भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. आणि आपण गांधींना त्याचे श्रेय देतो.

रशियाने साम्यवादी विचारप्रणालीने सोवियत संघाची स्थापना केली. हळूहळू साम्यवादी विचारप्रणाली पसरू लागली.

‘साम्यवाद’ हा लोकशाहीला असलेला खूप मोठा धोका आहे. म्हणून सर्व लोकशाहीवादी देशांनी एकत्र येऊन रशिया विरुद्ध लढा उभारला पाहिजे ही साद इंग्लंड, फ्रांस, जर्मनीला घातली. आणि त्यातून NATO चा जन्म झाला.

4 एप्रिल 1949 रोजी US प्रेसिडेंट हॅरी ट्रुमन यांच्या नेतृत्वाखाली NATO स्थापण आली. कोणत्याही देशाच्या अंतर्गत, राजकीय बाबीत रशियाचा हस्तक्षेप असल्यास NATO रशियाचा विरोध करायला पुढे येतो.

– गिरीश सावळा (अभ्यासक) 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here