नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 10 जण ठार तर 20 जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीकडे एक खासगी लक्झरी बस जात होती. बसमध्ये एकूण 45 जण होते.
या अपघातात 10 जण मृत्युमुखी पडले असून यात मोरीवली गावातील बहुतांशी रहिवाशांचा समावेश आहे. त्यामुळे मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता. या ट्रक चालकास सिन्नर पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे.
पीएम मोदींचा अपघातावर शोक व्यक्त
मुंबईपासून १८० किमी अंतरावर नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पठारे शिवारात सकाळी ६ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सात महिला, दोन मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. सिन्नरजवळील पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाक्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 45 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. तसेच उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला. या अपघातात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला. यातील काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून उड्या मारून जीव वाचविल्याचे सांगितले.
केंद्राने पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर केली
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.” जखमींना 50-50 हजार रुपये दिले जातील.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनीही आर्थिक मदत जाहीर केली
जखमींना सिन्नर ग्रामीण रुग्णालय व यशवंत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे
‘मृतांपैकी 6 जणांची ओळख पटली आहे, सर्व जखमींवर उपचार सुरू‘
निवेदनानुसार, शिंदे यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांशी बोलून जखमींना तातडीने नाशिक व शिर्डी येथे उपचारासाठी हलवून अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी करण्याचे निर्देश दिले. नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाधरन डी. म्हणाले की, प्राण गमावलेल्या 10 जणांपैकी सहा जणांची ओळख पटली आहे. नाशिकचे पालक मंत्री दादा भुसे यांनी सिन्नर येथील रूग्णालयाला भेट दिली असून काही जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घटनास्थळी भेट देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जखमींची नावे :
निधी उभळे, माया जाधव, प्रशांत मोहंसी, सिमा नेके, सपना डांगे, हर्षद वाडेकर, धनिषा वाडेकर, शिवण्या बवस्कर, आशा जयस्वाल, योगिता वाडेकर, योगीता वाडेकर, रंजना वोटले, सुप्रिया साहिल, ऋतीका रौंधळ, वषीराणी बेहरा, सुहास बवस्कर.
गंभीर जखमींची नावे :
वर्ष राणी बेहरा (31), योगिता संदेश वाडेकर (३०), मयुरी महेश बाइत (23), श्रुतिका संतोष गोंधळी (42), रंजन प्रभाकर पोटले (४०).
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम