नाशिक – शहरातील नाशिकरोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील एका ९ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळले आहे. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी अखेर त्या बाळाच्या तोंडातून नेलकटर बाहेर काढण्यात यश आले.
नाशिकरोड इथल्या के. जे. मेहता शाळेजवळ एक कुटुंब राहत आहे. त्याच्या घरातील ह्या बाळ घरात खेळत असताना अचानक त्याच्या हाती नेल्कातर लागले आणि ते गिळले. नंतर त्याला त्रास होताच त्याच्या आईने त्वरित डॉक्टरांकडे नेले. ह्यावेळी डॉक्टरांनी बाळाचा एक्स-रे बघताच डॉक्टर व बाळाच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
त्यावर त्याच्या आईने बाळाला त्वरित जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर अखेर आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्या बाळाला दाखल करण्यात आले व रात्री उशिरापर्यंत बाळावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. अखेर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर बाळाच्या तोंडातून नेलकटर काढत त्याचा जीव वाचवला. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली आहे.
सहसा, लहान मुले अनेकदा समोर असलेली वस्तू उचलून तोंडात टाकण्याच्या प्रयत्न करत असते. मात्र, ह्या घटनेमुळे आता पालकांनी आपल्या मुलांकडे बारीक लक्ष देण्याची गरज बनली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम