Nashik Voilence | नाशिकमध्ये घडलेल्या कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे हे आज तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले असून, सर्वप्रथम त्यांनी जखमी आंदोलकांची भेट घेत विचारपूस केली. कालच्या दगडफेकीच्या घटनेत जुन्या नाशकातील चारूदत्त आहेर आणि बाबलू परदेशी हे जखमी झाले असून, त्यांना आपोलो हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कालही पालकमंत्री भुसे यांनी फोनवरून या जखमींसोबत संवाद साधला होता. त्यानंतर आज नाशिकमध्ये दाखल होताच त्यांनी सर्वप्रथम जखमींची भेट घेत विचारपूस करत त्यांना सर्वोतोपरी मदतीचा विश्वास दिला. (Nashik Voilence)
काल घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनासोबत बैठक मंत्री भुसे (Dadaji Bhuse) अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत कालच्या घटनेचा आणि सध्याच्या परिस्थितीचा आढावा भुसे यांनी घेतला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधित दोषींना ताब्यात घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
Nashik Voilence | नाशकात ५ तास दंगलीची धग, नागरिकांचा जीव मुठीत; नेमकं काय घडलं..?
यापुढे अशा घटना घडणार नाही, यासाठी यंत्रणेला सतर्क राहण्याचे आणि शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना या बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी प्रशासनाला केले. कालची परिस्थिती ही पोलीस प्रशासनाने काळजीपूर्वक हाताळली असून यात 5 अधिकारी व 9 कर्मचारी जखमी झाले असून, त्यांचीही भेटही मंत्री भुसे यांनी घेतली. कालच्या घटनेत 6 गुन्हे दाखल असून आज परिस्थिती नियंत्रणात आहे. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
येणाऱ्या दिवसात सर्व धर्मीय सण उत्सव तोंडावर आहेत यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले. दंगलीत नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या त्यांना न्याय मिळेल, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. पोलिसांनी संवेदनशीलपणे ही संपूर्ण परिस्थिती हाताळली. यामुळे पोलीस प्रशासनाचेही यावेळी मंत्री भुसे यांनी अभिनंदन केले. या बैठकीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा हे उपस्थित होते.
नागरिकांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करू नये, शहराची शांतता भंग होणार नाही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी मंत्री भुसे यांनी नागरिकांना केले. समाज माध्यमांवर कुणीही अफवा पसरवू नये नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये संशयास्पद काही आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन देखील त्यांनी मध्यमांशी बोलताना केले.
Nashik News | नाशिकमध्ये तणावपूर्ण स्थिती, पालकमंत्री ॲक्शन मोडवर; प्रशासनाला सक्त निर्देश
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम