
देवळा : नाशिक ते पंढरपूर सायकलवारीत देवळा, सटाणा व नाशिक येथील सायकलिस्टान्नी सहभाग घेत पर्यावरणाचा संदेश दिला. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांच्या हस्ते या सायकलवारीचा शुभारंभ झाला. दोन मुक्काम करत ही सायकलवारी पंढरपूर येथे पोहोचली. यावेळी ठिकठिकाणी या सायकलवीरांचे उस्फुर्त स्वागत झाले.

या सायकलवारी दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले. भक्ती, पर्यावरण व शरीर सुदृढता हे उद्देश समोर ठेवून ही सायकलवारी काढण्यात आल्याचे येथील सायकलीस्ट अरुण पवार यांनी सांगितले. यावेळी नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, किशोर माने, ज्ञानेश्वर दुधाने, पांडुरंग कारवटे, नाना खारे, लालाजी पवार, चेतन पुरवत, अरुण पवार, जगन पवार, बागलाण सायकलीस्टचे अध्यक्ष डॉ.विशाल आहिरे व त्यांची पूर्ण टीम, डॉ.भाऊसाहेब पवार, नाशिक पोलीस उपायुक्त संजय पवार, किशोर काळे, सुधाकर सोनवणे, शुभम टकले, नागेश खारे, प्रमोद रेडे, नंदलाल कपडेकर, कुमार टकले आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम