Nashik Politics | ‘लोकप्रतिनिधींनीच ड्रग्सचे संकट पोसले’; वसंत गीतेंनी साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा

0
31
#image_title

Nashik Politics | “मागच्या दहा वर्षात भाविकांचे शहर, शैक्षणिक हब, यंत्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची वाट लागली असून गुन्हेगारी, ढासळलेला कायदा व सुव्यवस्था, जीवघेणी वाहतूक, ड्रग्सचा विळखा या सर्वात नाशिककर संकटात सापडले आहेत. या संकटातून आपल्याला नव्या पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचबरोबर, भयमुक्त व ड्रग्समुक्त नाशिकसाठी जेष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत आपल्या विजयासाठी” द्यावा. असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत गीते यांनी केले आहे.

Nashik Political | “आंबेडकरवादी जनता झिरवाळांसोबत”; रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारेंनी केले स्पष्ट

कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कार्यक्रम आयोजित

इंदिरानगर परिसरातील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना, अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा गीते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना वसंत गीते यांनी, “शहराची गेल्या दहा वर्षात विविध क्षेत्रात घसरण झाली असून केंद्र आणि राज्य तसेच महापालिका असे ट्रिपल इंजिन सरकार असणाऱ्या लोकप्रतिनिधींना एकही प्रकल्प शहरात आणता आला नाही. त्यामुळे नाशिककरांनो यंदा बदल हवा आहे. हा बदल घडवण्याकरिता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी दिली असून नाशिक मध्यचा विकास व सुरक्षेसाठी आपण पुन्हा एकदा सज्ज आहोत.” असे म्हटले आहे.

यावेळी कृतर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वासुदेव पांडे, दिनकर कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, विनायक पुरोहित, दत्तात्रेय जोशी, आनंद तडवळकर, जयवंत मोरे, सुवर्णा बालटे, श्रीकांत वडाळकर, जयश्री कुलकर्णी, शरद तिळवणकर, दिलीप इनामदार त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Nashik Political | बंडूकाका बच्छावांना मोठा धक्का; राजेंद्र देवरे यांची शिंदेच्या शिवसेनेत घरवापसी

मतदानातून बदल घडवण्याचे आवाहन

“नाशिक शहरात ड्रग्जचा विळखा इंदिरानगर वडाळा गाव परिसराला जास्त बसला असून लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्यांनी हे संकट ओढावले व पोसले आहे. त्यामुळे तरुणाई ड्रग्सच्या आहारी जात आहे. आपल्याला नवीन पिढीसाठी शहर वाचवायचे असेल तर ज्येष्ठ नागरिकांनी सजगतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. नाशिकला भयमुक्त व ड्रग्समुक्त करण्यासाठी मतदानाद्वारे बदल घडवा.” असे आवाहन गीते यांनी यावेळी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here