Nashik Political | काल दिनांक 23 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघ शिवसेनेच्या वाटायला आल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. तर काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी या मतदारसंघातून “उमेदवारी करणारच” असा पवित्रा घेतल्यामुळे ‘नाशिक मध्य’ मध्ये महाविकास आघाडीत बंडाचे निशाण फडकले आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती व महाविकास आघाडीला बंडाचा सामना करावा लागतो आहे.
Nashik Political | दिनकर पाटलांचा भाजपला राम राम; राज ठाकरेंच्या इंजिनावर विधानसभा लढवणार
डॉ. हेमलता पाटील निवडणूक लढवण्याचा ठाम
महायुतीमध्ये भाजपचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर, युतीतील घटक पक्षांना बंडाचा सामना करावा लागत असून सर्वात मोठे बंड “नाशिक पश्चिम” विधानसभा मतदारसंघात होत आहे. त्या पाठोपाठ आता महाविकास आघाडीत देखील बंडाचा सूर ऐकू येऊ लागला आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेसला हवी होती. या जागेसाठी काँग्रेसकडून मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी तयार केली होती. परंतु काँग्रेसने शिवसेनेला जागा सोडल्याने डॉ. पाटील यांनी बंड पुकारले असून कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले आहे.
Nashik Political नाशिक पश्चिमचे राजकिय समीकरण बदलणार!; डॉ. अपूर्व हिरेंचा उद्धवसेनेत प्रवेश
“काँग्रेसकडून नाशिक मध्य मधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. या जागेवर काँग्रेसचाच दावा होता. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडली आहे. तर “नाशिक मध्यची जागा लढवण्यावर मी ठाम असून, अपक्ष असो वा मैत्रिपूर्ण लढत मी माझी उमेदवारी कायम ठेवणार आहे.”
– डॉ. हेमलता पाटील, प्रवक्त्या, काँग्रेस
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम