Nashik News | नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात चक्क बाळाची अदला बदली झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. रविवार 13 ऑक्टोबर रोजी प्रसुतीकरिता एक महिला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर महिलेने बाळाला जन्म दिला व वैद्यकीय अधिकारी यांनी मुलगा झाल्याचे सांगितले. परंतु रुग्णालयातून डिस्चार्ज प्रमाणपत्र देताना मुलगी देण्यात आली. त्यावरून नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वाद झाले. या प्रकरणामुळे वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात आले असून प्रशासनाला याबाबत जाब विचारला जात आहे.
Nashik News | नाशकात तोफ गोळ्याच्या प्रशिक्षणावेळी भीषण स्फोटात दोन अग्निवीर जवानांचा मृत्यू
डिस्चार्ज देताना बाळ बदलल्याने नातेवाईकांकडून रुग्णालयात गोंधळ
रविवार 13 ऑक्टोबर रोजी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात एक महिला रात्री बाळंतपणासाठी दाखल झाली असता, महिलेने मुलाला जन्म दिला असल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. तसेच रुग्णालयाने रुग्णालयाच्या रजिस्टरमध्ये मुलाच्या जन्माची नोंद देखील केली. परंतु मंगळवारी दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी डिस्चार्ज प्रमाणपत्र देताना महिलेच्या हाती मुलगी देण्यात आली. मुलाच्या जागी मुलगी देण्यात आल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. यावेळी नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत संताप व्यक्त करण्यात आला.
Nashik News | नाशकात ऐन पावसाळ्यात पाण्याची टंचाई; संतप्त महिलांचा महानगरपालिकेवर हंडा मोर्चा
सदर प्रकरणात प्रहार संघटनेची उड
या प्रकरणांनी जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली. त्यानंतर कुटुंबीयांनी बाळ घेण्यास नकार दिला. त्यानंतर रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. परंतु कुटुंबीय ऐकायला राजी नव्हते. या प्रकरणात आता प्रहार संघटनेने देखील उडी घेतली असून रुग्णालय प्रशासनावर आरोप करण्यात येत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम