Nashik News | नाशिकच्या सिडको परिसरातील स्थानिक महिलांनी नाशिक महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला असून मागील काही महिन्यांपासून सिडको, नवीन नाशिक, खुटवडनगर या परिसरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने निषेध व्यक्त करत सोमवार दि. 14 ऑक्टोबर रोजी माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढला आहे. यावेळी महिलांनी महापालिकेच्या प्रवेशनावर हंडे आपटत पाणीपुरवठा विभागाचा निषेध केला. मनपायुक्तांनी आंदोलकांची प्रवेशद्वारावर येऊन भेट घेतली नआही तर महापालिकेत शिरण्याचा इशारा देखील त्यांच्याकडून यावेळी देण्यात आला.
Nashik News | नाशकात तोफ गोळ्याच्या प्रशिक्षणावेळी भीषण स्फोटात दोन अग्निवीर जवानांचा मृत्यू
माजी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली महिलांचा हंडामोर्चा
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनियमित पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, वीज समस्या असे विषय चर्चेत येऊ लागले असून मोर्चाप्रसंगी माजी नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्याकडून पाणीपुरवठा विस्कळीत होण्यामागे राजकारण असल्याचा दावा केला जात आहे. तर सर्व राजकीय पक्ष, विद्यमान आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करूनही अनेक भागातील पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे महिला वर्गातील असंतोष या आंदोलनातून दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका सुवर्णा मटाले युवा सेना जिल्हाध्यक्ष दीपक दातीर, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता सिडको, खुटवडनगर भागातील महिलांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हंडामोर्चा काढला. अचानक घडलेल्या या घटनेने मनपाच्या सुरक्षारक्षकांची पुरतीच तारांबळ उडाली.
Nashik News | गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांना पकडण्यात लासलगाव पोलिसांना यश
पावसाळ्यातही पाण्याची समस्या
आंदोलनावेळी महिलांनी प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर हंडे आदळून पाणीपुरवठा विभागाचा निषेध नोंदवला. तर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी धारणकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील केली. संतप्त महिलांनी ठिय्या देत मनपा आयुक्तांच्या प्रवेश्वरावर न्याय देण्याची मागणी केली उन्हाळ्यात धरणात पाणी नसताना पाणी कपात ही बाब नागरिकांनी गृहीत धरली. मात्र पावसाळ्यात धरणे तुडुंब भरलेली असताना सुद्धा अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या एक्सो पॉइंट ते खुटवडनगर भागात पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे शहरात जाणीवपूर्वक कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी माजी नगरसेवकांनी केला आहे. पाण्याअभावी घरातील दैनंदिन कामे करणे अशक्य झाले असून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने दैनंदिन गरजही भागत नसल्याची तक्रार महिलांनी यावेळी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम