Nashik Loksabha | भुजबळांच्या सुनबाई निवडणुकीच्या रिंगणात..?

0
38
Nashik Loksabha
Nashik Loksabha

Nashik Loksabha |  गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेसाठी चढाओढ सुरू आहे. महायुतीचे तिन्ही प्रमुख पक्ष हे या जागेसाठी आग्रही आहेत. ही जागा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे आमची ही पारंपारीक जागा आम्हालाच मिळावी. यासाठी शिंदे गट आग्रही आहे. नाशिकच्या जागेसाठी एकनाथ शिंदेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागाही सोडली.

तर, दुसरीकडे नाशिक हा आधी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. येथे समीर भुजबळ आणि देविदास पिंगळे हे खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे नाशिकची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळावी. यासाठी अजित पवार गटही आग्रही आहे. दरम्यान, या वादात मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर होते. थेट अमित शाह यांनी आपल्या नावावर शिकामोर्तब केला. मात्र, राज्यातील महायुतीचे नेते उमेदवारी जाहीर करत नसल्याची नाराजी व्यक्त करत भुजबळांनी निवडणुकीतून जाहीर माघार घेतली.

मात्र, तरीही राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेवरील दावा सोडला नसल्याचे वक्तव्य अजित पवार गटाच्या नेत्यांनी केले. दरम्यान, नाशिकच्या जागेवरून सुरू असलेल्या या नाट्यमय घडामोडींमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला असून, सूत्रांच्या माहितीनुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या सूनबाई डॉ. शेफाली भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pritam Munde | काय सांगता..! ना गोडसे, ना बोरस्ते; प्रीतम मुंडे नाशिकच्या उमेदवार..?

आधी प्रीतम मुंडे आता शेफाली भुजबळ

नुकतंच पंकजा मुंडे यांनी आपण प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभे करू, असे वक्तव्य केल्याने प्रीतम मुंडे यांचेही नाव नाशिकच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत सामील झाले. मात्र, यात पुन्हा एक मोठा ट्विस्ट आला असून, सूत्रांच्या माहितीनुसार आता मंत्री छगन भुजबळांच्या स्नुषा आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पत्नी डॉ. शेफाली समीर भुजबळ या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नाहीतर, जवळपास त्यांचे नाव फायनल झाले असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Chhagan Bhujbal | भुजबळांना उमेदवारी न देणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचा जाहीर निषेध

Nashik Loksabha | कोण आहेत डॉ. शेफाली भुजबळ..?

डॉ. शेफाली भुजबळ ह्या मंत्री छगन भुजबळ यांच्या स्नुषा आणि नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या एक प्रशिक्षित भरतनाट्यम नर्तक, शिक्षणतज्ज्ञ, आणि उद्योजिकाही आहेत. डॉ. शेफाली भुजबळ यांनी अनेक वर्षांपासून आपला चित्रकलेचा छंद जोपासला असून, त्यांचा चित्रकला क्षेत्रात अभ्यास देखील आहे. त्यांच्या  निसर्गायण, अनावरणम् या चित्रप्रदर्शनांना उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. त्यांनी मॅनेजमेंट विषयात डॉक्टरेट केले असून, त्यांनी भरतनाट्यममध्येही विशेष प्राविण्य मिळविलेले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here