Nashik IT Raid | नाशिकमध्ये ३० तासांची रेड..!; सराफ व्यवसायिकाकडे कोटींचं घबाड

0
41
Nashik IT Raid
Nashik IT Raid

Nashik IT Raid |  गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये सराफ आणि बांधकाम व्यवसायिकांच्या घरी छापे टाकण्यात आले होते. गेल्या ३० तासांपासून ही कारवाई सुरू असून, या करवाई दरम्यान प्राप्तिकर विभागाला (Income Tax Department) मोठे गबाड भेटले आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये विभागाने मोठी  कारवाई केली होती.

यानंतर आता नाशिकमध्येही अशाच प्रकारची करण्यात आली असून, या कारवाईत नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील एका प्रसिद्ध सराफ व्यवसयिकाच्या मालमत्तांवर छापे टाकून प्राप्तिकर विभागाने तब्बल २६ कोटी रुपये आणि जवळपास ९० कोटी किंमतीच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या या मोठ्या कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Nashik IT Raid)

Nashik ACB | लाच घेताना नाशिकच्या बड्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले

Nashik IT Raid | ३० तास सुरू होती कारवाई 

दरम्यान, नाशिकमधील ही कारवाई नाशिक, नागपूर आणि जळगाव येथील सर्व अधिकाऱ्यांनी मिळून केली होती. तर, या कारवाईत प्राप्तिकर विभागाने एकूण २६ कोटींची रोकड जप्त केली आहे. तर, ही जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठीच या अधिकाऱ्यांना १४ तास लागले असून, एकूण सात गाड्या बोलवाव्या लागल्या आहेत. सलग ३० तास ही संपूर्ण कारवाई सुरू होती. (Nashik IT Raid)

जवळपास ५० ते ५५ अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी आणि त्यांच्या बांधकाम व्यवसायाच्या कार्यालयात छापे टाकले होते. त्याचवेळी त्यांच्या नाशिकमधील राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यातही स्वतंत्र पथकानेकडून तपासणी केली जात होती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेली त्यांची कार्यालये, खासगी लॉकर्स आणि बँकांमधील लॉकर्सचीही यावेळी चौकशी करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांची मनमाड व नांदगाव येथील घरीही चौकशी करण्यात आली.(Nashik IT Raid)

Nashik News | नाशिकमधील चौकशीत ईडीला यश; कोट्यवधींचे घबाड सापडले

नाशिकमधील दुसरी मोठी कारवाई

यापूर्वीही नाशिकमध्ये बांधकाम व्यवसायिकांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. त्यावेळीही नाशिकमधून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली होती आणि आता ही प्राप्तिकर विभागाची नाशिकमधील दुसरी मोठी कारवाई असून, शहरातील एका प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता आणि रोकड सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे नाशिकमधील बड्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आता पुढील कारवाई कोणावर होणार..? याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here