Nashik Goda Aarti | त्र्यंबकेश्वरच्या महंतांचा लाठ्या-काठी घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा

0
51
Nashik Goda Aarti
Nashik Goda Aarti

Nashik Goda Aarti |  नाशिकच्या पंचवटी येथील गोदावरी आरती वरून पुरोहित संघ व रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धात गेल्या आठवड्यात माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गुप्त बैठक घेऊन ग्रामसभा घेणार असल्याचे ठरवले होते. त्यानंतर पंचवटीतील एका कार्यालयात साधू, महंत व नाशिककरांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पाडली. यात गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघच आरती करणार यावर ठाम राहत भविष्यात रामतीर्थ सेवा समिती याबाबत आग्रही राहील्यास साधू, महंत लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा यावेळी या साधू महंतांनी दिला.(Nashik Goda Aarti)

Nashik Goda Aarti | नेमकं प्रकरण काय..?

गोदा जन्मोत्सवाचे औचित्य साधून येत्या १९ फेब्रुवारी रोजी ‘रामतीर्थ गोदावरी सेवा समिती’च्या वतीने या ‘गोदा महाआरती’चा शुभारंभ करण्यात येणार आहे. दुसरीकडे या महाआरतीला विरोध करण्यासाठी पुरोहित संघाकडून विविध स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. पुरोहित संघाने या समितीला विरोध करत आमच्याकडून अनेक वर्षांपासून गोदाआरती सुरु असल्याचे सांगत या नव्याने तयार करण्यात आलेल्या समितीमुळे आपल्या हक्कांवर गदा येणार असल्याचे सांगत विरोध करण्यास सुरुवात केली आहे.(Nashik Goda Aarti)

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे नाशिकमध्ये; असा असेल ‘नशिक दौरा’..?

लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर उतरू 

दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि. १२) ग्रामसभा घेण्यात आली. ही ग्रामसभा रामकिशोरदास शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रास्ताविक पुरोहित संघाचे कार्याध्यक्ष तथा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सरचिटणीस यांनी केले. यावेळी बोलताना महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितले की, “गोदा आरतीमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून रामतीर्थ गोदावरी सेवा समिती निर्माण करण्यात आल्याचा आरोप करत ही समिती बेकायदेशीर असून, या समितीविरोधात करवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यापुढे कुठलीही सभा, बैठक घेणार नसून आरतीचा घाट घालण्याचा प्रयत्न केल्यास हातात लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.(Nashik Goda Aarti)

Deola | नमो चषकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव – आ. राहुल आहेर

त्यामुळे भविष्यात ही लढाई रस्त्यावर लढली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून, या ग्रामसभेत पुरोहित संघाकडून होणाऱ्या सायंकाळच्या गोदावरी आरतीकरिता आखाडयाचे साधु, संत, महंत आणि शहरातील धार्मिक संस्थेचे प्रतिनिधी यांना सोबत घेऊन गोदावरी आरतीचे आयोजन करण्याचा ठराव राहुल कुलकर्णी यांनी मांडला व त्याला सर्वांनी मान्यता दिली. दरम्यान, या ग्रामसभेला महंत रामकिशोर दास शास्त्री महाराज, महंत भक्तीचरण दास महाराज, महंत सुधीर पुजारी, महंत रामस्नेहीदास महाराज आदी उपस्थित होते.(Nashik Goda Aarti)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here