Nashik | (चांदवड) : नांदेडच्या घटनेनंतर केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री असेलल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील चांदवडमधील ट्रॉमा केअर सेंटर बंद अवस्थेत आहे. चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमाकेअर बंद अवस्थेत असल्याने रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विशेष म्हणजे चांदवड देवळ्याचे आमदार देखील नामांकित डॉक्टर असून वैद्यकीय व्यवस्था मात्र आजारी असल्याने नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी हा प्रश्नच आहे.(Nashik)चांदवडच्या ट्रॉमा केअर मध्ये युनिट नसल्याने सद्या ट्रॉमा केअर सेंटर मध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलेला पहायला मिळतो आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि आमदार तसेच मंत्री नेमकं कुणासाठी काम करताय असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
Nashik | नाशिकच्या शेतकऱ्याचा ड्रॅगन फ्रुट शेतीचा अफलातुन प्रयोग
चांदवड तालुक्यातील PM केअरचे 25 व्हेंटिलेरवर बंद अवस्थेत असून, गेल्या काही दिवसांपूर्वी प्राची विवेक मोरे या शाळकरी विद्यार्थ्यांनीचा व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाला होता. सर्प दंश झाल्याने प्राथमिक उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचार केल्या नंतर डॉक्टरांनी व्हेंटिलेटरची गरज असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. मात्र यात रस्त्यातच प्राचीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. प्राथमिक उपचार देखील सोयीस्कर मिळत नसल्याने अनेक रुग्णाचे हाल याठिकाणी होत आहेत. या मतदार संघात ग्रामपंचायत पासून ते केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांपर्यंत प्रतिनिधित्व करत असलेल्या डॉ. भारती पवार मतदार संघात लक्ष देणार का याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. डॉक्टर आमदार आणि केंद्रीय राज्यआरोग्य मंत्री या मतदार संघाचे आरोग्य सुधारणार का हे पाहणे महत्वाचे आहे. भविष्यात ट्रॉमा केअर सेंटर बंद अवस्थेत असलेले सुरू होवून नागरिकांचे हाल थांबण्यासाठी प्रयत्न करणार का हे देखील पाहणे महत्त्वाचे असेल.
डॉ.राहुल आहेर माजी आरोग्यमंत्री स्व.डॉ.डि.एस.(बाबा)आहेर यांचे पुत्र आहेत. डॉ.बाबांनी त्यांच्या कार्यकाळात आरोग्य यंत्रनेला मोठी उभारी दिली होती.त्यांच्या कारकिर्दीत राज्यभरात मोठमोठी रुग्णालये, आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विज्ञान विद्यापिठाची स्थापना देखील त्यांनी केलेली होती.तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोडकळीस आलेल्या आरोग्य यंत्रनेला नवसंजीवनी दिली.मात्र त्यांचे पुत्र आमदार असलेल्या चांदवड-देवळा मतदारसंघात आरोग्य यंत्रनेचा बोजवारा उडाला असुन चांदवडच्या ट्रॉमा केअर मध्ये मांणसांऐवजी कुत्र्यांचा सुळसुळाट पहायला मिळतोय.यामुळे मतदारसंघातील नागरीक सरकारी वैद्यकीय सेवेपासुन वंचित राहत आहेत.
Nashik | नाशिकचे ग्रामदैवत कालिकामातेचे नवरात्रोत्सवात 24 तास दर्शन
डॉ.भारती पवार यांच्याकडुन भ्रमनिरास…
डॉ.भारती पवार या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री या पदावर विराजमान झाल्यानंतर जिल्हावासियांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. नागरीकांसाठी आरोग्य सुविधा, एक चॅरीटी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालयांचं आधुनिकीकरण आणि तांत्रिकीकरण, आरोग्य व्यवस्था सुसज्ज करणे हे अपेक्षित असताना याचा भ्रमनिरास झाला आहे.
चांदवडच्या ट्रॉमा केअर व्यवस्थित सुरु आहे.फक्त जुन्या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये ऑपरेशन करणं बंद झाल्यामुळे नविन इमारतीमध्ये सर्व रुग्णांवर उपचार केले जात आहे.गेल्या काही दिवसांपुर्वी मनपाकडुन ऍनिमल ट्रॅप काढला गेला होता त्यामुळे इथे प्राण्यांचा वावर वाढलेला आहे.बाकी चांदवडच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये सर्व रुग्णांवर उपचार केले जात आहे.- MS नवनाथ आव्हाड
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम