नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक पदी सतीश देशमुख विजयी

0
34
देवळा / नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक पदी सतीश देशमुख विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना माजी सरपंच भाऊसाहेब पगार ,जितेंद्र आहेर , शिवाजी अहिरे , महेंद्र पाटील ,प्रतीक आहेर ,अनिल आहेर आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : नाशिक जिल्हा मजूर संस्थेच्या देवळा तालुका संचालक पदी माजी अध्यक्ष सतीश विश्वासराव देशमुख प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी दि २५ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले . व मतमोजणी आज सोमवारी (दि २६ ) रोजी नाशिक येथे पार पडली.

देवळा / नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक पदी सतीश देशमुख विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना माजी सरपंच भाऊसाहेब पगार ,जितेंद्र आहेर , शिवाजी अहिरे , महेंद्र पाटील ,प्रतीक आहेर ,अनिल आहेर आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

यात तालुक्यातील लोहोनेर येथील रहिवाशी व फेडरेशनचे माजी संचालक व अध्यक्ष सतीश देशमुख सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. फेडरेशनच्या देवळा तालुका संचालक पदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. यात सुनील देवरे (,वाजगाव ), सुभाष गायकवाड (उमराणे ) व सतीश देशमुख ( लोहोणेर ) यांचा समावेश होता.

बिनविरोध निवडीचा मार्ग धूसर बनल्याने प्रारंभी तिरंगी वाटणारी लढत शेवटी एकतर्फी झाली. उमेदवार सतीश देशमुख शेवटपर्यंत मतदारांशी संपर्क ठेवण्यात यशस्वी ठरल्याने तालुक्यातील एकूण ४६ सभासदांपैकी ४४ सभासदांनी देशमुख यांना मतदान करून विजयी केले . याकामी उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे , माजी सरपंच भाउसाहेब पगार , फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील , शिवाजी अहिरे , अभिमन अहिरे , उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,अनिल आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.

विजयी उमेदवार सतीश देशमुख यांचे देवळा शहरात आगमन होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला . यावेळी कुबेर जाधव, निंबा धामने, सुभाष देवरे, राजेंद्र मेतकर,बंडु परदेशी, योगेश पाटील, अशोक गुंजाळ, गटनेते संभाजी आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार , अर्जुन आहीरे, कैलास आहेर, योगेश वाघमारे, समाधान अहिरराव, महेंद्र पाटील , दिनेश जाधव ,कैलास देवरे , संजय चंदन, प्रतीक आहेर , रमेश अहिरे , योगेश पवार आदींसह मजुर सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते .

फेडरेशनच्या तालुका संचालक पदाच्या निकालावरून आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत कलाटणी मिळणार असल्याची यावेळी चर्चा होती. नवनिर्वाचीत संचालक सतीश देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here