Nashik Crime | नाशिकच्या फर्टीलायझर कंपनीला लाखोंचा गंडा

0
34
Nashik Crime News
Nashik Crime News

नाशिक : नाशिकमधून एक मोठी घटना उघडकीस आली असून, यानुसार नाशिकमधील एका फर्टीलायझर कंपनीची तब्बल ५१ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीनुसार, तक्रारदार रोशन गणेशराव मोरे हे अक्षत फर्टीलायझर कंपनीचे बिझनेस हेड म्हणून कार्यरत आहेत.

रोशन मोरे  यांनी त्यांच्या आपल्या अक्षत फर्टीलायझर या कंपनीचा माल हा विक्रीसाठी घोटी येथील रायगड कृषी उद्योग या दुकानाचे संचालक संशयित आरोपी सागर कैलास शिंदे यांच्याशी करार केला होता. मात्र, खते घेऊन रक्क न दिल्याने त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी आतापर्यंत (Nashik Police) एकाला ताब्यात घेतले आहे.

Nashik Crime | नाशिकच्या सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिकावर गुन्हा दाखल

तब्बल ४० लाखांची खते खरेदी केली 

दरम्यान संशयित आरोपी सागर शिंदे याने अक्षत फर्टीलायझर अॅण्ड प्लान्ट न्यूट्रिशियन या कंपनीकडून पेमेंट अदा न करता आगाऊ खते घेतली. त्यानंतर पुन्हा त्याने ४० लाख रुपये किंमतीची खते घेतली. आतापर्यंत तब्बल ४० लाखांची खते संबंधित आरोपीला देण्यात आलिया सन, त्याने खते घेतल्याचे पेमेंट अदा केले नाही.

Nashik Crime | नाशिकमध्ये नामांकित हॉस्पिटलच्या ICU मध्ये डॉक्टरवर हल्ला

धनादेश वटलाच नाही

यानंतर मात्र पैशांसाठी कंपनीने तगादा लावल्याने आरोपीने ५१ लाख २७ हजारांचा धनादेश हा थकित पेमेंटच्या स्वरूपात दिला. मात्र हा धनादेश बँकेत वटूच शकला नाही. तमुळे फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीने या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी सागर शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here