Nashik | अंगणवाडीत विद्यार्थांच्या पोषण आहारात आढळल्या अळया; चांदवडमधील घटना

0
12

Nashik | अंगणवाडीमध्ये बालकांना सकस आहार मिळावा हा शासनाचा उद्देश आहे. मात्र, चांदवड येथे दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क अळ्या सापडल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अंगणवाडीमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अनेक ठिकाणी काही ना काही समस्या उद्भवलेल्या वेळोवेळी पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना चांदवड तालुक्यात उघड झालेली आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे.(Nashik)

Malegaon | ‘जवान’च्या शो दरम्यान मालेगावच्या चित्रपटगृहात फटाक्यांची आतिषबाजी

चांदवडमधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. चांदवड तालुक्यातील वडाळी भोई येथील अंगणवाडीतील विद्यार्थांना पोषण आहारासाठी देण्यात आलेल्या गहू आणि मकाच्या भरड्यात अळया,किडे,बुरशी आढळल्याची घटना घडलेली आहे.हा सर्व धक्कादायक प्रकार पालकांच्या जागरूकतेमुळे उघडीस आलेला आहे.या सर्व या प्रकाराने चांदवड गावात उडाली एकच खळबळ उडालेली आहे. अंगणवाडीतील बालकांचे आरोग्य धोक्यात असल्याने पालकांनी संताप व्यक्त व्यक्त केला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की, चांदवड येथील अंगणवाडी मध्ये बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. या पोषण आहारात अळ्या असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. पालकांनी तात्काळ अंगणवाडी जाउन तेथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ‌यांना‌ जाब विचारला.

Malegaon | ‘जवान’च्या शो दरम्यान मालेगावच्या चित्रपटगृहात फटाक्यांची आतिषबाजी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here