देवळा ; येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवळा व सप्तश्रृंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यांच्या
संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी १७ रोजी, मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला तसेच पदवीदान समारंभ संपन्न झाला .
या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात देवळा शिवस्मारक ते शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाजगाव रोड देवळा या मार्गावर आयोजित करण्यांत आलेली होती. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष. जितेंद्र आहेर यांचे हस्ते झाला.
मॅरेथॉन स्पर्धेच्या विजेत्यांना नगराध्यक्षा सुलभा आहेर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे;
पुरुष गट- प्रथम ;गणेश पवार, द्वितीय-तेजस जाधव, तृतीय- देविदास सोनजे
महिला गट.- प्रथम ;रविना ठाकरे, द्वितीय- सुनंदा
पवार, तृतीय- कोमल जाधव.
पदवीदान समारंभ-
दरम्यान ,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित केलेल्या पदवीदान समारंभात, अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा जुलै २०२३ मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक वितरीत करण्यांत आले.
नगराध्यक्ष सुलभा आहेर, . डी. जी. मोरे. , सरपंच केवळ गांगुर्डे, , प्राचार्य. एस. डी. तिदमे, आदी मान्यवर उपस्थित होते. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणामध्ये आय. टी. आय. चे महत्व व रोजगाराच्या संधी या विषयावर मान्यवरांनी विचार मांडले व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उत्तीर्ण विद्याथ्र्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जास्तीत जास्त विद्याथ्र्यांना आयटीआय चे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे विषद केले.
संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
फोटो ओळ ; १) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करतांना नगरसेवक जितेंद्र आहेर समवेत आयटीआय चे कर्मचारी व विद्यार्थी २) मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिक वितरित करतांना नगराध्यक्षा सुलभा आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम