मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना हृदयासंबंधी त्रास होऊ लागला असल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणेंवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
नारायण राणे यांना आज सकाळी अचानक हृदयासंबंधी त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता राणे यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचं कोणतंही कारण नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसेच राणे यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम