राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडी सरकारला चांगलाच धक्का दिला आहे. पुरेसं संख्याबळ असताना देखील महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीवरून (Nana Patole) दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असताना, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना फोन येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबतचे फोन रेकॉर्डींग आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा :
मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी,संजय राऊतांचा अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर निशाणा
माध्यामांशी बोलताना पटोले म्हणाले की, “केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या काही आमदारांना फोन करत आहेत. ते फोन कसे करत आहेत, याचं रेकॉर्डींग आमच्याकडे आहे. योग्य वेळी आम्ही हे रेकॉर्डींग दाखवू. केंद्रीय तपास यंत्रणांकडून फोन करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण अशा दबावाला कुणी घाबरणार नाही,” असंही (Nana Patole) पटोले म्हणाले.
येत्या सोमवार २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. या मतदानापूर्वीच आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरू झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीकरिता विरोधकांना २२ मतं हवी आहेत. पण एवढी मतं त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, पैशांचा वापर यांचा उपयोग आता भाजपला होणार नाही, असा टोला पटोले (Nana Patole) यांनी लगावला.
रेडिओअॅक्टिव्हिटी संशोधन करणाऱ्या महिलेला गूगलकडून मानवंदना
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम