Nagpur | हिवाळी अधिवेशनाच्या (winter session) काळात आमदारांना राहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून आमदार निवासाकडे बघितले जाते. पण, अनेक आमदार हे हॉटेलमध्येच राहणे पसंत करतात. दरम्यान, ह्या आमदार निवासांमधील साध्या खोल्यांमध्ये ह्या नेत्यांचे कार्यकर्ते राहतात. आमदारांनी येथे राहावे, यासाठी येथील सोयी-सुविधांमध्ये वाढ करावी, येथील खोल्या एसी कराव्यात, अशी मागणी ह्या आमदारांकडून होत आहे.(Nagpur)
ह्या पार्श्वभूमीवर आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एसीसह सर्व अद्ययावत सुविधा असलेल्या दोन खोल्या यह्या येथे मॉडेल म्हणून तयार करण्यात आलेल्या आहेत. अशाच सुविधा आता इतर खोल्यांमध्येही तयार कराव्यात, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.
दरम्यान, आता येत्या हिवाळी अधिवेशनासाठी (winter session) आमदार निवास हे आमदारांसाठी सज्ज होत आहे. रंगरंगोटीसह इतर कामे ही अंतिम टप्प्यात आलेली असून, येत्या ५ डिसेंबरपर्यंत उर्वरित सर्व कामेदेखील पूर्ण होतील. असा विश्वास ‘पीडब्ल्यूडी’कडून व्यक्त करण्यात येत आहे. ह्या आमदार निवासमध्ये तीन विंग आहेत. येथे आमदारांना राहण्यासाठी विंग १ मध्ये १३२, तर विंग २ मध्ये १८३ व विंग ३ मध्ये ७१ खोल्या आहेत. विंग ४ मध्ये १६ सभागृहदेखील तयार करण्यात आलेले आहेत.(Nagpur)
Unique Temple | एक अनोखं शिवमंदिर; जिथे शिवलिंग बदलते रंग अन् बेडूक करतो रक्षण
येथे विधानभवनात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्थादेखील केली जाते. ह्या आमदार निवासांची रंगरंगोटी ही नियमितपणे केली जात असली तरी आमदार इथे राहायला इच्छुक नसतात. तरीही सर्व सुविधांनी अद्ययावत खोल्या तयार कराव्यात, अशी मागणी ह्या आमदारांकडून करण्यात येत आहे.(winter session)
२५ कोटींचा खर्च
आमदार निवसतील विंग २ मध्ये पीडब्ल्यूडीकडून तयार करण्यात आलेल्या ह्या दोन अद्ययावत खोल्यांमध्ये एसीसह इंटरनेटचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तळमजल्यावर एक व पहिल्या मजल्यावर एक खोली तयार करण्यात आलेली आहे. गरज पडली तर बेडदेखील तयार होईल.
असा ‘टू इन वन’ सोफादेखील येथे ठेवण्यात आला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या खोल्यांची पाहणी केली. मंजुरी मिळाल्यानंतर अशा पद्धतीनेच इतर खोल्यांचेदेखील नूतनीकरण करण्यात येईल. दरम्यान, यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, असे पीडब्ल्यूडीकडून सांगण्यात आले आहे.(Nagpur)
अधिवेशनाची इतर तयारीही जोरात
१. आमदार निवासातील विंग २ व विंग ३ येथे रिसेप्शन काउंटर तयार केले जात आहे.
२. ह्या आमदारांना फेरफटका मारण्यासाठी येथील बगिचाही सुशोभित करण्यात आला आहे.
३. कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी इतर दुरुस्तीची कामेही करण्यात आली आहेत.
५. ह्या बंगल्याचे हेरिटेज रूप हे कायम राहावे, यावर भर दिलेला असून, नूतनीकरणासाठी १ कोटी ८ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम